मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : पेट्रोल माफियाला पुण्यात दणका; विमानाचे इंधन चोरणारी टोळी गजाआड; २ कोटी २८ लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune Crime : पेट्रोल माफियाला पुण्यात दणका; विमानाचे इंधन चोरणारी टोळी गजाआड; २ कोटी २८ लाखांचा मुद्देमाल जप्त

Apr 10, 2023, 07:05 AM IST

    • Pune loni kalbhor Crime news : पुण्यातील लोणीकाळभोर येथे पेट्रोल माफियाच्या टोळीला पुणे पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून तब्बल २ कोटी २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Pune loni kalbhor Crime news

Pune loni kalbhor Crime news : पुण्यातील लोणीकाळभोर येथे पेट्रोल माफियाच्या टोळीला पुणे पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून तब्बल २ कोटी २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    • Pune loni kalbhor Crime news : पुण्यातील लोणीकाळभोर येथे पेट्रोल माफियाच्या टोळीला पुणे पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून तब्बल २ कोटी २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पुणे : पुण्यातील लोणीकाळभोर परिसरात पेट्रोलचोरीचा पर्दाफाश पुणे पोलिसांनी केला आहे. एका मोठ्या पेट्रोलियम कंपनीच्या टँकरमधून विमानाला लागणाऱ्या पेट्रोलची चोरी करताना एका टोळीला रंगेहात पकडण्यात आले आहे. पोलिसांनी चोरट्यांकडून तब्बल २४ हजार लिटर इंधन, आठ टँकर असा दोन कोटी २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शिर्डी विमानतळाकडे निघालेल्या टँकरमधून ही इंधन चोरी होत होती. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

सुनिलकुमार प्राणनाथ यादव (वय २४ रा. हडपसर, मूळ रा. प्रतापगढ, लालगंज, उत्तरप्रदेश), दाजीराम लक्ष्मण काळेल (वय ३७ मूळ रा. वळई ता. माण, सातारा ), सचिन रामदास तांबे (वय ४० रा. हडपसर), शास्त्री कवलु सरोज (वय ४८ रा.हडपसर), सुनिल रामदास तांबे (वय ३८ रा. हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. हडपसर भागात पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्या वेळी पोलीस कर्मचारी मनोज सुरवसे यांना इंधन चोरट्यांच्या टोळीची माहिती मिळाली.

नवी मुंबईतील वाशी येथून एटीफ पेट्रोल (विमानासाठी वापरण्यात येणारे पेट्रोल) तसेच डिझेल भरून टँकर शिर्डी विमानतळाकडे निघाले होते. इंधन कंपनीकडून प्रवासाचा मार्ग निश्चित करण्यात आला होता. या सोबतच टँकरचा माग घेण्यासातीह विशिष्ट यंत्रणा त्यात बसवण्यात आली होती. दरम्यान कंपनीच्या अधिकाऱ्यांना आरोपींकडून इंधन चोरी होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने हडपसर परिसरात छापा टाकला. यावेळी आरोपी टँकरमधून इंधन चोरी करत असल्याचे दिसले.

पोलिसांनी वरील पाच जणांना अटक करून त्यांच्याकडून इंधन भरलेले दोन टँकर, आठ रिकामे टँकर, १४ प्लास्टिक कॅन असा २ कोटी २८ लाखांचा ऐवज जप्त केला. या घटनेची माहिती इंधन कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. इंधन कंपनीतील अधिकारी तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या