मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: घरच्या घरी करायचंय परफेक्ट योगा? उपयुक्त ठरतील 'या' टिप्स

Yoga Mantra: घरच्या घरी करायचंय परफेक्ट योगा? उपयुक्त ठरतील 'या' टिप्स

Jan 16, 2023, 08:18 AM IST

    • Yoga at Home: फिट राहण्यासाठी योगा खूप फायदेशीर आहे. योगा करण्यासाठी कुठे बाहेर जायचे नसेल तर हे टिप्स तुमची मदत करतील. या फॉलो करुन तुम्ही घरी योगा करु शकता.
योगासन (Freepik)

Yoga at Home: फिट राहण्यासाठी योगा खूप फायदेशीर आहे. योगा करण्यासाठी कुठे बाहेर जायचे नसेल तर हे टिप्स तुमची मदत करतील. या फॉलो करुन तुम्ही घरी योगा करु शकता.

    • Yoga at Home: फिट राहण्यासाठी योगा खूप फायदेशीर आहे. योगा करण्यासाठी कुठे बाहेर जायचे नसेल तर हे टिप्स तुमची मदत करतील. या फॉलो करुन तुम्ही घरी योगा करु शकता.

Tips To Do Perfect Yoga: आजकालच्या बिझी लाईफस्टाइलमुळे अनेकांना त्यांच्या फिटनेसकडे योग्य लक्ष देता येत नाही. यामुळेच खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव यामुळे बहुतांश लोक लठ्ठपणा, मधुमेह यांसारख्या अनेक आजारांना बळी पडत आहेत. तुमच्या बाबतीतही असेच काही घडत असेल तर तुम्ही घरी बसून थोडा वेळ योगासाठी काढला पाहिजे.

ट्रेंडिंग न्यूज

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

joke of the day : तू अजून लग्न का केलं नाहीस, असं जेव्हा कोकिळा कावळ्याला विचारते…

Mango Lassi Recipe: उन्हाळ्याच्या दिवसांत ट्राय करा ७ प्रकारची मँगो लस्सी! मूडही फ्रेश होईल अन् शरीर थंड राहील!

योगाभ्यास केल्याने व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत बनते. तुमचे शरीर अनेक गंभीर आजारांपासून सुरक्षित राहते. अनेकांना असे वाटते की योगा करणे अवघड आहे. जर तुम्ही देखील अशा लोकांमध्ये असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही घरी देखील योगा सहज करू शकता. चला जाणून घेऊया घरी योग करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

घरच्या घरी योगा करण्यासाठी टिप्स (Tips to start yoga at home)

झोपण्याची वेळ निश्चित करा

सकाळी लवकर उठून योगासने करण्यासाठी तुम्हाला लवकर झोपावे लागते. जर तुम्ही लवकर झोपलात तरच तुम्ही सकाळी फ्रेश मूडने उठू शकाल. सर्व प्रथम तुमची झोपण्याची वेळ निश्चित करा आणि दररोज ते फॉलो करा. झोपताना मोबाईल, लॅपटॉप बेडवर ठेवू नका.

छोटे गोल बनवा

योगासनाच्या सुरुवातीला लहान योग सेशनने करा. जेणेकरून शरीरात कोणताही त्रास होणार नाही. सुरुवातीला स्नायू दुखू शकतात, परंतु हळूहळू ही वेदना स्वतःच निघून जाईल. तुमचे वय आणि शारीरिक समस्या लक्षात घेऊनच योगाभ्यास करा.

शांत जागा निवडा

योगासने करण्यासाठी शांत जागा निवडा. नंतर आरामदायी स्थितीत बसा. आता दीर्घ आणि लांब श्वास घ्या. असे केल्याने मन शांत राहते आणि शरीर आरामदायी स्थितीत येते.

सोप्या आसनांनी सुरू करा

योगासन सुरू करण्यासाठी सर्वप्रथम कोणत्याही सुलभ योग, आसनची मदत घ्या. यासाठी ताडासन, शवासन, कपालभाती या योगासनांचा सराव करू शकता. या सर्व सोप्या आसनांमुळे तुमचे शरीर कठीण योगासनांचा सराव करण्यासाठी तयार होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग

पुढील बातम्या