मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: वर्किंग वुमनने नियमित करा हे योगासन आणि सर्व समस्यांना करा बाय बाय

Yoga Mantra: वर्किंग वुमनने नियमित करा हे योगासन आणि सर्व समस्यांना करा बाय बाय

Jan 17, 2023, 08:27 AM IST

    • Extended Puppy Pose : नोकरी आणि घर यांचे बॅलेन्स करताना महिला तारेवरची कसरत करत असतात. यात ते स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करतात. ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. वर्किंग वुमनसाठी हे योगासन खूप उपयुक्त आहे.
उत्तान शिषोसन (Freepik)

Extended Puppy Pose : नोकरी आणि घर यांचे बॅलेन्स करताना महिला तारेवरची कसरत करत असतात. यात ते स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करतात. ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. वर्किंग वुमनसाठी हे योगासन खूप उपयुक्त आहे.

    • Extended Puppy Pose : नोकरी आणि घर यांचे बॅलेन्स करताना महिला तारेवरची कसरत करत असतात. यात ते स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करतात. ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. वर्किंग वुमनसाठी हे योगासन खूप उपयुक्त आहे.

Yoga for Working Woman: प्राचीन काळापासून योग हा मनुष्याच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी फायदेशीर मानला जातो. शरीरात लवचिकता आणण्यापासून चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यापर्यंत, निरोगी वजन राखण्यापासून ते शरीर मजबूत करण्यापर्यंत योगाचे अगणित फायदे आहेत. अशीच एक उत्तम योग मुद्रा म्हणजे उत्तान शिषोसन. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमची मान, कंबर, पाठ आणि नितंबांशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळवू शकता. चला तर जाणून घेऊया उत्तान शिषोसनबद्दल सविस्तर

ट्रेंडिंग न्यूज

International Museum Day 2024: का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन? जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि थीम

Egg Kofta Curry: अंडा कोफ्ता करी सोबत बनवा वीकेंड खास, बनवायला खूप सोपी आहे रेसिपी

Beauty Trend: तांदूळ आणि त्याच्या पाण्यापासून बनवलेले हे फेस पॅक होत आहे व्हायरल, तुम्ही ट्राय केले का?

World Hypertension Day 2024: ही आहेत हायपरटेन्शनची सुरुवातीची लक्षणं, व्यवस्थापित करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

उत्तान शिषोसन म्हणजे काय?

उत्तान शिषोसन हे आरामदायी योगासन आहे, ज्याला एक्स्टेंडेड पपी पोज असेही म्हणतात. हे योगासन पिल्लाप्रमाणे तुमचे संपूर्ण शरीर आराम करण्यावर लक्ष केंद्रित करते. याच्या नियमित सरावाने तुम्हाला अनेक शारीरिक आणि मानसिक फायदेही मिळतात. हे योग आसन करताना तुमची कंबर आणि खांदे चांगले ताणले जातात. ज्यामुळे कंबरेपासून खांद्यापर्यंतच्या सर्व समस्यांवर फायदा होतो.

नियमित उत्तान शिषोसन केल्याचे फायदे (Extended puppy pose benefits)

लोअर बॅकला आराम मिळतो - बऱ्याच स्त्रिया ज्या एकाच स्थितीत दीर्घकाळ काम करतात, त्यांना पाठीच्या खालच्या भागात वेदना होत असल्याची तक्रार असते. उत्तान शिषोसन करताना पाठीपासून नितंबांपर्यंतचे सर्व स्नायू सकारात्मक पद्धतीने ताणले जातात. ज्यामुळे हिप स्पॅम आणि कडकपणाच्या समस्यांपासून आराम मिळतो.

खांद्याच्या दुखण्यापासून आराम मिळतो - उत्तान शिषोसन केल्याने तुमच्या खांद्यावर पूर्ण ताण येतो. त्यामुळे खांद्याचे सर्व स्नायू चांगले ताणले जातात. या आसनामुळे खांद्याशी संबंधित समस्यांमध्ये आराम मिळतो.

मन शांत होण्यास मदत होते - उत्तान शिषोसन करताना तुमच्या शरीराचा वरचा भाग खालच्या दिशेने असतो. तर शरीराचा खालचा भाग वर करावा लागतो. हे खांद्यापासून नितंबांपर्यंत स्नायूंना चांगले ताणते. हे आसन तुम्हाला पूर्णपणे आराम देते, तुमच्या नितंबांपासून तुमच्या मेंदूपर्यंत रक्त परिसंचरण सुधारते. ज्याद्वारे तुम्ही तणावमुक्त होऊ शकता.

मणक्यावर सकारात्मक प्रभाव पडतो - ऑफिसमध्ये सात ते आठ तास सतत काम केल्यानंतर तुमचे पोश्चर बिघडू लागले आहे हे लक्षातही येत नाही. सकाळी तुम्ही सरळ बसून सुरुवात करू शकता. पण संध्याकाळी तुमची पाठ वाकणे सुरू होते. ज्याचा परिणाम तुमच्या मणक्याच्या दुखण्याच्या स्वरूपात होतो. त्याच वेळी, जेव्हा तुम्ही शिषोसन करता तेव्हा तुमच्या मणक्याला पूर्णपणे ताणण्याची संधी मिळते. यामुळे तुमच्या पाठीच्या सर्व समस्या दूर होतात.

ही आहे उत्तान शिषोसन करण्याची योग्य पद्धत

सर्वप्रथम वज्रासनाच्या मुद्रेत जमिनीवर बसा.आता दीर्घ श्वास घेताना दोन्ही हात वर करा. हळू हळू श्वास सोडताना तुमचे शरीर पुढे टेकवा. आता तुमचे दोन्ही हात जमिनीवर ठेऊन तुमच्या पाठीचा खालचा भाग वर करा. या आसनात तुमचे पाय सरळ आणि पाठ वरच्या दिशेने असावी. तसेच तुमचे कपाळ जमिनीवर ठेऊन आपले हात पुढे असले पाहिजेत. हे आसन काही वेळ धरून सामान्यपणे श्वास घ्या. शेवटी, दीर्घ श्वास घ्या आणि सुरुवातीच्या स्थितीत परत या.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग

पुढील बातम्या