मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chinese Bhel: वीकेंडची संध्याकाळ खास बनवण्यासाठी ट्राय करा चायनीज भेळची रेसिपी, झटपट होते तयार

Chinese Bhel: वीकेंडची संध्याकाळ खास बनवण्यासाठी ट्राय करा चायनीज भेळची रेसिपी, झटपट होते तयार

Apr 06, 2024, 06:39 PM IST

    • Weekend Special Snacks Recipe: लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना चायनीज खायला आवडते. संध्याकाळी स्नॅक्ससाठी तुम्ही चायनीज भेळ बनवू शकता. पाहा याची रेसिपी.
Chinese Bhel: वीकेंडची संध्याकाळ खास बनवण्यासाठी ट्राय करा चायनीज भेळची रेसिपी, झटपट होते तयार (freepik)

Weekend Special Snacks Recipe: लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना चायनीज खायला आवडते. संध्याकाळी स्नॅक्ससाठी तुम्ही चायनीज भेळ बनवू शकता. पाहा याची रेसिपी.

    • Weekend Special Snacks Recipe: लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना चायनीज खायला आवडते. संध्याकाळी स्नॅक्ससाठी तुम्ही चायनीज भेळ बनवू शकता. पाहा याची रेसिपी.

Chinese Bhel Recipe: जर तुम्हाला तुमच्या वीकेंडला आणखी चटपटीत बनवायचे असेल तर ही चटपटीत चायनीज भेळ नक्की बनवा. भारतीय घरांमध्ये स्नॅक्स म्हणून चाटचे प्रकार खूप आवडते. पण चायनीज भेळ ही एक इंडो-चायनीज स्ट्रीट स्नॅक रेसिपी आहे, जी कमी वेळात तयार करणे खूप सोपे आहे. या रेसिपीचे वैशिष्ट्य म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ते खायला आवडते. चला तर मग वाट कसली पाहता जाणून घेऊया भारतीय आणि विदेशी मसाल्यांनी भरलेल्या क्रंची चायनीज भेळची रेसिपी कशी बनवायची.

ट्रेंडिंग न्यूज

Sandalwood Face Pack: उन्हाळ्यात घामोळ्या आणि पिंपल्सपासून आराम देईल चंदन, पाहा कसा बनवायचा फेस पॅक

Yoga Mantra: उन्हाळ्यात तुमचे शरीर थंड ठेवतील ही ३ योगासनं, जाणून घ्या फायदे आणि करण्याची योग्य पद्धत

Kedarnath Yatra: केदारनाथच्या आजूबाजूला आहेत ही सुंदर ठिकाणं, ती पाहिल्याशिवाय अपूर्ण राहील ट्रीप

Onion Pickle: जेवणासोबत सर्व्ह करा टेस्टी कांद्याचे लोणचे, प्रत्येक जण विचारेल रेसिपी

चायनीज भेळ बनवण्यासाठी साहित्य

- १ पॅकेट हाका नूडल्स

- २ टेबलस्पून गाजर उभे बारीक कापून

- २ टेबलस्पून कोबी बारीक चिरून

- २ टेबलस्पून शिमला मिरची उभी बारीक कापून

- २ टेबलस्पून कांदा उभा कापलेला

- १ टेबलस्पून शेझवान सॉस

- १ टीस्पून लाल चिली सॉस

- १ टीस्पून ग्रीन चिली सॉस

- १ टीस्पून व्हिनेगर

- १/२ टीस्पून साखर

- चवीनुसार मीठ

चायनीज भेळ बनवण्याची पद्धत

चायनीज भेळ बनवण्यासाठी प्रथम एका पॅनमध्ये नूडल्स उकळवा. नंतर त्यातील पाणी काढून टाका आणि थंड पाण्याने धुवा. आता कढईत तेल गरम करा आणि उकडलेले नूडल्स सोनेरी होईपर्यंत तळा. यानंतर एका पॅनमध्ये सर्व भाज्या, सॉस, मीठ आणि साखर एकत्र करा. आता यात तळलेले नूडल्स घाला आणि चांगले मिक्स करा. या नूडल्सला कोथिंबीरीने सजवा आणि लगेच सर्व्ह करा. हे नूडल्स बनवून खूप जास्त वेळ ठेवू नका. त्याच्या क्रंची टेस्टची मजा घेण्यासाठी ते बनवणल्यावर लगेच खा.

पुढील बातम्या