मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mango Kheer: डेझर्टमध्ये बनवा आंब्याची खीर, नोट करा समर स्पेशल रेसिपी

Mango Kheer: डेझर्टमध्ये बनवा आंब्याची खीर, नोट करा समर स्पेशल रेसिपी

May 28, 2023, 10:16 PM IST

    • Summer Special Dessert: उन्हाळा म्हटलं की पहिले डोळ्यासमोर आंबा येतो. त्याचे विविध पदार्थ आवडीने खाल्ले जातात. तुम्ही सुद्धा आंबा प्रेमी असाल तर डेझर्टमध्ये आंब्याची खीर बनवा.
आंब्याची खीर

Summer Special Dessert: उन्हाळा म्हटलं की पहिले डोळ्यासमोर आंबा येतो. त्याचे विविध पदार्थ आवडीने खाल्ले जातात. तुम्ही सुद्धा आंबा प्रेमी असाल तर डेझर्टमध्ये आंब्याची खीर बनवा.

    • Summer Special Dessert: उन्हाळा म्हटलं की पहिले डोळ्यासमोर आंबा येतो. त्याचे विविध पदार्थ आवडीने खाल्ले जातात. तुम्ही सुद्धा आंबा प्रेमी असाल तर डेझर्टमध्ये आंब्याची खीर बनवा.

Mango Kheer Recipe: उन्हाळ्याचा सीझन सुरू झाल्यानंतर मार्केट आंब्याच्या सुंगधाने भरून जाते. मँगो फ्रूट सॅलड किंवा शेक बहुतेक घरांमध्ये बनवले जाते. पण या उन्हाळ्यात तुम्ही आंब्यासोबत टेस्टी मँगो खीर ट्राय करू शकता. आंब्यापासून बनवलेली ही स्पेशल डेझर्ट खायला खूप टेस्टी तर आहेच पण बनवायलाही खूप सोपी आहे. चला तर मग वाट कसली पाहताय, जाणून घ्या कशी बनवायची टेस्टी मँगो खीर.

ट्रेंडिंग न्यूज

Mango Shake: उन्हाळ्यात प्या थंडगार मँगो शेक, घरी बनवण्यासाठी फॉलो करा रेसिपी

World Telecommunication Day 2024: जागतिक दूरसंचार दिवस साजरा करण्याचा उद्देश काय? काय आहे यावर्षीची थीम?

joke of the day : मूडमध्ये असलेल्या नवऱ्यानं बनवलेल्या जेवणाला बायकोनं कशी दाद दिली पाहाच!

National Endangered Species Day 2024: राष्ट्रीय लुप्तप्राय प्रजाती दिन साजरा करण्याचा इतिहास काय आहे? जाणून घ्या या दिवस

आंब्याची खीर बनवण्यासाठी साहित्य

- १ लीटर फूल क्रीम दूध

- आंब्याचा पल्प

- अर्धा कप तांदूळ

- अर्धा कप साखर

- काजू (बारीक काप)

- बदाम (बारीक काप)

- वेलची पूड

आंब्याची खीर बनवण्याची पद्धत

आंब्याची खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात दूध उकळण्यासाठी ठेवा. या दरम्यान काजू आणि बदामचे छोटे छोटे तुकडे करून घ्या. दुधाला उकळी आल्यावर गॅस कमी करा आणि दुधात तांदूळ घाला आणि थोडा वेळ ढवळत असताना शिजवा. दुधात तांदूळ शिजल्यानंतर आता त्यात काजू आणि बदामचे काप टाका. चांगले मिक्स करा, खीर ढवळत रहा आणि १० मिनीट शिजू द्या. खीर चांगली घट्ट होऊन भात दुधात चांगला शिजला की त्यात साखर आणि वेलची पूड टाकून मिक्स करा. ५ मिनिटे मंद आचेवर खीर शिजवा. खीर गॅसवरून उतरवून घ्या आणि थोडी थंड होण्यासाठी ठेवा. खीर थंड झाल्यानंतर त्यात मँगो पल्प टाकून मिक्स करा.

तसेच त्यात बारीक कापलेले आंब्याचे तुकडे देखील टाकून मिक्स करा. तुमची आंब्याची खीर तयार आहे. वरून काजू, बदामचे काप आणि आंब्याचे तुकडे टाकून गार्निश करा आणि सर्व्ह करा.

विभाग

पुढील बातम्या