Snacks for Kids: काही मिनिटांत तयार करा मेयोनीज आणि मॅकरोनीचे टेस्टी सॅलड, मुलांसाठी आहे परफेक्ट इव्हनिंग स्नॅक्स
Best Evening Snacks for Kids: जर मुले संध्याकाळच्या नाश्त्यात बाहेरचे जंक फूड खाण्याचा आग्रह धरत असतील तर त्यांना चविष्ट आणि क्रीमयुक्त मॅकरोनी सॅलड तयार करून खायला द्या. ते काही मिनिटांत तयार होते.
Macaroni Salad with Cream Cheese Recipe: संध्याकाळी भूक लागल्यावर मुले बाहेरचे जंक फूड खाण्याचा हट्ट करतात. चीज आणि क्रीम असलेले बाहेरचे पदार्थ जर प्रत्येकाला आवडत असतील तर तुम्ही ते घरीही बनवून खाऊ शकता. तसेच त्यात हेल्दी भाज्या सुद्धा घाला. जेणेकरून ते चवदार आणि निरोगी होईल. मॅकरोनी सॅलड संध्याकाळी काही मिनिटांत तयार केले जाऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया काय आहे मॅकरोनी सॅलड बनवण्याची सोपी रेसिपी.
ट्रेंडिंग न्यूज
मॅकरोनी सॅलड बनवण्यासाठी साहित्य
- १०० ग्रॅम मॅकरोनी
- १ लाल शिमला मिरची
- १ पिवळी शिमला मिरची
- काकडी
- गाजर
- स्वीट कॉर्न
- लेट्यूसची पाने
- कांदा
ड्रेसिंगसाठी
- ३/४ कप मेयोनीज
- १/४ था कप क्रीम
- मीठ चवीनुसार
- १/४ चमचा काळी मिरी पावडर
- लसूण पावडर
- ओरेगॅनो
- चिली फ्लेक्स
मॅकरोनी सॅलड बनवण्याची पद्धत
सर्वप्रथम मॅकरोनी पाण्यात टाकून उकळा. मॅकरोनी उकळताना त्यात मीठ घाला. जेणेकरून मॅकरोनीमध्ये मीठाची चव येते. मॅकरोनी पाण्यातून गाळून बाजूला ठेवा. आता सर्व भाज्या बारीक चिरून घ्या. आता एका मोठ्या बाउलमध्ये मेयोनीज, क्रीम मिक्स करा. नंतर त्यात मीठ, काळी मिरी पावडर, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स घालून मिक्स करा.
या ड्रेसिंगमध्ये उकडलेले मॅकरोनी घाला. बारीक चिरलेल्या भाज्या एकत्र मिक्स करा. तुमचे चविष्ट मॅकरोनी सॅलड तयार आहे. मुलांसोबतच मोठ्यांनाही ते खायला आवडेल.