मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  De Tan Pack: उन्हामुळे खराब झाला चेहऱ्याचा रंग? महागडे फेशियल नव्हे तर लावा हा डी-टॅन पॅक

De Tan Pack: उन्हामुळे खराब झाला चेहऱ्याचा रंग? महागडे फेशियल नव्हे तर लावा हा डी-टॅन पॅक

Apr 20, 2023, 10:15 AM IST

    • Summer Skin Care: कडक उन्हात गेल्यावर त्वचा काळी दिसू लागते. अशा परिस्थितीत चेहऱ्याचा रंग सुधारण्यासाठी तुम्ही पार्लरमध्ये महागडे फेशियल करत असाल. तर त्याऐवजी हा एक डी-टॅन फेस पॅक वापरा.
त्वचेचे टॅनिंग दूर करण्यासाठी डी-टॅन पॅक

Summer Skin Care: कडक उन्हात गेल्यावर त्वचा काळी दिसू लागते. अशा परिस्थितीत चेहऱ्याचा रंग सुधारण्यासाठी तुम्ही पार्लरमध्ये महागडे फेशियल करत असाल. तर त्याऐवजी हा एक डी-टॅन फेस पॅक वापरा.

    • Summer Skin Care: कडक उन्हात गेल्यावर त्वचा काळी दिसू लागते. अशा परिस्थितीत चेहऱ्याचा रंग सुधारण्यासाठी तुम्ही पार्लरमध्ये महागडे फेशियल करत असाल. तर त्याऐवजी हा एक डी-टॅन फेस पॅक वापरा.

De Tan Pack to Remove Tanning: उन्हाळ्यात त्वचेच्या टॅनिंगमुळे चेहऱ्याचा आणि हात-पायांचा रंग बदलू लागतो. प्रत्येकाला या समस्येचा सामना करावा लागतो. जेव्हा उन्हामुळे त्वचेचा टोन खराब होतो तेव्हा त्याला टॅनिंग म्हणतात. त्यामुळे त्वचेची नैसर्गिक चमक लपते आणि चेहऱ्यावर काळे डाग दिसू लागतात. याला सामोरे जाण्यासाठी महिला पार्लरमध्ये महागडे फेशियल करतात. पण तुम्ही घरच्या घरी सुद्धा यापासून सुटका मिळवू शकता. टॅनिंग दूर करण्यासाठी घरगुती डी टॅन फेस पॅक देखील उपयुक्त ठरू शकतात. हा डी टॅन पॅक कसा बनवायचा ते जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

Yoga Mantra: उन्हाळ्यात तुमचे शरीर थंड ठेवतील ही ३ योगासनं, जाणून घ्या फायदे आणि करण्याची योग्य पद्धत

Kedarnath Yatra: केदारनाथच्या आजूबाजूला आहेत ही सुंदर ठिकाणं, ती पाहिल्याशिवाय अपूर्ण राहील ट्रीप

Onion Pickle: जेवणासोबत सर्व्ह करा टेस्टी कांद्याचे लोणचे, प्रत्येक जण विचारेल रेसिपी

High Blood Pressure: अनियंत्रित रक्तदाबामुळे होऊ शकतात या समस्या, वेळीच घ्या काळजी

Summer Skin Care: उन्हात गेल्यावरही काळी पडणार नाही त्वचा, फक्त लक्षात ठेवा या गोष्टी

डी टॅन पॅक बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे -

- केळीची साल

- अर्धी केळी

- लिंबाचा एक तुकडा

- पपईचा एक तुकडा

- अर्धा कच्चा बटाटा

- एलोवेरा जेल

- दोन चमचे बेसन

- दही

Rose Oil: सुरकुत्यांना ठेवायचंय लांब तर वापरा गुलाबाचे तेल, घरी बनवणे आहे सोपे

कसे बनवावे

हे डी टॅन पॅक बनवण्यासाठी प्रथम फळांची पेस्ट बनवा. नंतर या पेस्टमध्ये अर्धा बटाटा आणि लिंबाचा तुकडा टाका. ते चांगले मिक्स करा आणि पेस्ट बनवा. आता त्यात बेसन, दही आणि एलोवेरा जेल टाका. नीट मिक्स करुन पेस्ट तयार करा. नंतर ही पेस्ट स्वच्छ चेहऱ्यावर लावा. साधारण ७ ते १० मिनिटांनी थोडे कोरडे झाल्यावर केळीची साल चेहऱ्यावर हलक्या हातांनी चोळा. आता स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

पुढील बातम्या