मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Skin Care Tips: चेहऱ्याचे मॉइश्चर आणि ग्लो टिकवण्यासाठी लावा 'हे' उटणे, या पद्धतीने बनवा

Skin Care Tips: चेहऱ्याचे मॉइश्चर आणि ग्लो टिकवण्यासाठी लावा 'हे' उटणे, या पद्धतीने बनवा

Jan 21, 2023, 11:31 AM IST

    • Winter Skin Care: हवेतील ओलाव्याची कमतरता आणि वाढते प्रदूषण या दोन्हींमुळे त्वचा खूप खराब होते. या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही उटणे वापरू शकता. कसे बनवायचे ते येथे जाणून घ्या. 
होममेड उटणे

Winter Skin Care: हवेतील ओलाव्याची कमतरता आणि वाढते प्रदूषण या दोन्हींमुळे त्वचा खूप खराब होते. या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही उटणे वापरू शकता. कसे बनवायचे ते येथे जाणून घ्या.

    • Winter Skin Care: हवेतील ओलाव्याची कमतरता आणि वाढते प्रदूषण या दोन्हींमुळे त्वचा खूप खराब होते. या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही उटणे वापरू शकता. कसे बनवायचे ते येथे जाणून घ्या. 

Ubtan for Face to Maintain Moisture and Shine: हिवाळ्यात लोक खूप आळशी होतात. यामुळेच अनेक वेळा ते स्किन केअरकडे देखील दुर्लक्ष करतात. त्याच वेळी या ऋतूमध्ये ओलावा नसणे आणि प्रदूषणाची वाढती पातळी यामुळे त्वचेचे बरेच नुकसान होते. अशा वेळी तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी उटणे वापरू शकता. ते तयार करण्यासाठी कमी वेळ लागतो आणि परिणाम आश्चर्यकारक मिळतता. उटणे तुमची डेड स्किन सेल्स काढून टाकते आणि त्वचेला नवीन ताजेपणा देते. तसेच रक्तप्रवाह सुरळीत राहण्यास मदत होते. रंग सुधारण्यासाठी आणि त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी उटणे कसे बनवायचे ते पहा.

ट्रेंडिंग न्यूज

Dull Skin Care: घाम आणि धुळीमुळे त्वचा निस्तेज झाली का? उपयुक्त ठरेल काकडीचा फेस पॅक

Fitness Mantra: तुमचे वजन जास्त असेल तर करा हे पायांचे व्यायाम, सोपे होईल वेट लॉस

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

कसे बनवावे उटणे

हे बनवण्यासाठी तुम्हाला पाहिजे -

- दोन चमचे डाळीची पावडर

- एक चमचा तांदळाचे पीठ

- दोन लिंबाचा रस

- एक चमचा कच्चे दूध

उटणे बनवण्यासाठी सर्व साहित्य चांगले मिक्स करा आणि नंतर स्वच्छ चेहऱ्यावर लावा. नंतर काही वेळाने ते सुकल्यावर हात ओले करून नंतर चेहऱ्याला सर्कुलर मोशनमध्ये मसाज करा. सर्व उटणे हाताने साफ करण्याचा प्रयत्न करा. आणि नंतर पाण्याने चेहरा धुवा.

असे बनवा देसी उटणे

यासाठी दोन चमचे बेसन, एक चमचा मोहरीचे तेल, एक चमचा कच्चे दूध घ्या. त्यात चिमूटभर हळद टाकू शकता. हे सर्व चांगले मिक्स करा. नंतर आपल्या शरीरावर आणि चेहऱ्यावर लावा. त्याचा थोडासा भाग घेऊन मसाज करा. काही वेळ राहू द्या आणि नंतर पाण्याने स्वच्छ करा. हे उटणे लावल्यानंतर साबणाचा वापर करु नका.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग

पुढील बातम्या