मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Winter Skin Care Tips: हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा दूर करायचा? आंघोळ करताना नक्की करा या गोष्टी

Winter Skin Care Tips: हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा दूर करायचा? आंघोळ करताना नक्की करा या गोष्टी

Jan 08, 2024, 10:32 AM IST

    • Dry Skin Care: थंडीमध्ये त्वचा खूप जास्त कोरडी होते. त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी आंघोळ करताना काही गोष्टी केल्या पाहिजे. कोणत्या त्या जाणून घ्या.
हिवाळ्यात आंघोळ करताना करा या गोष्टी (unsplash)

Dry Skin Care: थंडीमध्ये त्वचा खूप जास्त कोरडी होते. त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी आंघोळ करताना काही गोष्टी केल्या पाहिजे. कोणत्या त्या जाणून घ्या.

    • Dry Skin Care: थंडीमध्ये त्वचा खूप जास्त कोरडी होते. त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी आंघोळ करताना काही गोष्टी केल्या पाहिजे. कोणत्या त्या जाणून घ्या.

Bath Routine to Prevent Dryness in Winter: हिवाळा म्हटला की कोरड्या त्वचेची समस्या त्रास देऊ लागते. त्यातही ज्या लोकांची त्वचा आधीच ड्राय असते त्यांना आणखी समस्यांचा सामना करावा लागतो. प्रत्येक जण कोरड्या त्वचेवर मॉइश्चरायझर लावतो. पण काही तासांनंतर त्याचा प्रभाव देखील संपतो. हिवाळ्यात कोरड्या त्वचेपासून सुटका हवी असेल तर रोज अंघोळ करताना या गोष्टी करा. संपूर्ण शरीराची त्वचा सॉफ्ट आणि स्मूद होईल. या गोष्टी केल्याने त्वचेचा कोरडेपणा कमी होतो.

ट्रेंडिंग न्यूज

World Hypertension Day 2024: का साजरा केला जातो वर्ल्ड हायपरटेन्शन डे? जाणून घ्या इतिहास आणि यावर्षीची थीम

Ovarian Cancer: वेळेवर तपासणी केल्याने ओव्हेरियन कॅन्सरवर मात करणे शक्य, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Kadhi Recipe: उडीद आणि बेसन घालून बनवा छत्तीसगडची प्रसिद्ध कढी, झटपट तयार होते ही रेसिपी

Thick Eyelashes: पापण्या दाट आणि लांब करण्यासाठी करा हे उपाय, वाढेल डोळ्यांचे सौंदर्य

साबणाऐवजी वापरा बॉडी वॉश

हिवाळ्यात साबणाऐवजी बॉडी वॉश वापरा. बॉडी वॉश त्वचेला अधिक मॉइश्चरायझ करते. तर साबणाच्या वापराने त्वचा पूर्णपणे निर्जीव आणि कोरडी होते. त्यामुळे हिवाळ्यात साबण वापरणे टाळा.

कोमट पाणी

हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करणे कठीण असते. अशा स्थितीत पाणी गरम पाण्याने आंघोळ केली जाते. पण आंघोळीचे पाणी जास्त गरम नसावे हे लक्षात ठेवा. त्यापेक्षा हे पाणी थोडे कोमट असावे. खूप गरम पाण्यामुळे त्वचेचे नैसर्गिक तेल देखील नष्ट होते आणि त्वचा अधिक कोरडी दिसू लागते.

स्क्रब अवश्य करा

दररोज त्वचा एक्सफोलिएट करण्याची खात्री करा. अनेकदा त्वचेवर जमा झालेली डेड स्किन कोरडी आणि निर्जीव होते आणि वेगळी दिसते. या डेड स्किन नैसर्गिक स्क्रबने स्वच्छ करा. विशेषत: कोपर, गुडघे, टाच अशा ज्या भागात जास्त कोरडेपणा आहे हे भाग अधिक घासून स्वच्छ करा. यामुळे कोरडेपणापासून लवकर आराम मिळतो.

 

आंघोळीपूर्वी तेल लावा

आंघोळीच्या काही मिनिटे आधी संपूर्ण शरीरावर नारळाचे तेल किंवा ऑलिव्ह ऑइल लावा. यामुळे त्वचा अधिक मॉइश्चराइज राहते आणि कोरडेपणा येत नाही. हात आणि पाय तसेच शरीराला तेलाने मसाज करा आणि सुमारे १० ते १५ मिनिटांनी कोमट पाण्याने आंघोळ करा. असे केल्याने त्वचेमध्ये आर्द्रता टिकून राहते आणि त्वचा कोरडी होत नाही. तुम्ही आंघोळीनंतरही थोडेसे तेल हात आणि पायाला लावू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

पुढील बातम्या