Tips to Clean Hands and Fingers: हिवाळ्यात हिरव्या भाज्या, हरभरा, तुरीच्या शेंगा हे खायला प्रत्येकाला आवडतात. पण हे साफ करताना किंवा चिरताना हात काळे होतात. विशेषतः मेथी निवडताना आणि तुरीचे दाणे काढताना हात काळे होण्याची तक्रार महिला नेहमीच करतात. असे हात स्वच्छ न केल्यास ते खूप खराब दिसतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला हिरव्या भाज्या कापल्यानंतर हात स्वच्छ करायचे असतील तर तुम्ही काही पद्धतींचा अवलंब करू शकता. या पद्धती तुम्ही सहज फॉलो करू शकता आणि आपले हात स्वच्छ करु शकता.
- भाजी कापल्यानंतर तुमचे हात काळे झाले असतील तर ते स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्यात भिजवा. या पाण्यात तुम्ही लिंबू किंवा शॅम्पू टाकू शकता. यामुळे तुमची बोटे आणि नखे व्यवस्थित स्वच्छ होतील.
- हात स्वच्छ करण्यासाठी तुम्ही टोमॅटो वापरू शकता. यासाठी टोमॅटोचा एक छोटा तुकडा घ्या आणि नंतर तो हातावर नीट चोळा. तुम्हाला हवे असल्यास टोमॅटोऐवजी लिंबूही चोळू शकता.
- हात खूप घाण झाले असतील आणि अनेक उपाय करूनही स्वच्छ होत नसतील तर तळहातावर थोडे व्हिनेगर लावा आणि घासा. नंतर हात साबणाने व पाण्याने चांगले स्वच्छ धुवा.
- हात स्वच्छ करण्यासाठी दुधाचाही वापर करू शकता. ते वापरण्यासाठी एकतर आपले हात दुधात बुडवा किंवा थोडे दूध हातावर लावून त्यांना चोळा.
- हात स्वच्छ करण्यासाठी कच्चा बटाटा देखील उपयुक्त ठरू शकतो. यासाठी बटाट्याचे तुकडे घ्या आणि त्याने हात घासा. किंवा तुम्ही कच्चा बटाटा किसून सुद्धा वापरू शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या