Face Pack: हिवाळ्यात या ३ पद्धतीने बनवा फेस पॅक, काळ्या आणि ड्राय स्किनपासून मिळले मुक्ती
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Face Pack: हिवाळ्यात या ३ पद्धतीने बनवा फेस पॅक, काळ्या आणि ड्राय स्किनपासून मिळले मुक्ती

Face Pack: हिवाळ्यात या ३ पद्धतीने बनवा फेस पॅक, काळ्या आणि ड्राय स्किनपासून मिळले मुक्ती

Published Jan 04, 2024 03:53 PM IST

Winter Face Pack: हिवाळ्यात त्वचा खूप कोरडी आणि डल होते. यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही ३ प्रकारचे फेस पॅक घरी बनवून चेहऱ्यावर लावू शकता. हे कसे बनवायचे ते जाणून घ्या.

हिवाळ्यासाठी फेस पॅक
हिवाळ्यासाठी फेस पॅक (unsplash)

Face Pack for Black and Dry Skin: हिवाळ्यात त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते. थंड हवेमुळे त्वचा निर्जीव आणि कोमेजून जाते. तसेच कोरड्या त्वचेमुळे चेहरा रफ, खडबडीत आणि पांढरा दिसतो. तर काही लोकांची त्वचा काळी पडते. या प्रकारच्या समस्या टाळण्यासाठी त्वचेचे आतून पोषण करणे आवश्यक आहे. काही फेस पॅक असे आहेत जे तुम्ही लावल्यास त्वचेची गेलेली चमक परत येते. शिवाय हे त्वचा मुलामय देखील बनवतात. जाणून घ्या हे कोणते फेस पॅक आहेत आणि ते कसे वापरावे.

नारळाचे दूध

हिवाळ्यासाठी सर्वोत्तम मॉइश्चरायझिंग फेस पॅकपैकी एक म्हणजे नारळाचे दूध आहे. नारळाचे दूध ओलावा टिकवून ठेवते. हे तुमच्या त्वचेची लवचिकता आणि पोत सुधारण्यास मदत करते. एक नारळ किसून घ्या आणि मिक्सरमध्ये थोडे पाणी वापरून चांगले मिक्स करा. नारळाचे दूध काढण्यासाठी ही पेस्ट गाळून घ्या. आता नारळाचे दूध कॉटन पॅडने तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर समान रीतीने लावा. साधारण २० मिनिटे राहू द्या आणि कोमट पाण्याने चेहरा धुवा. तुम्ही हे रोज वापरले तर चांगला फायदा होईल.

हनी फेस पॅक

कोरड्या, पॅचेस असलेल्या त्वचेसाठी मध उत्तम आहे आणि त्याचा फायदा घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते गुलाब पाण्यात मिक्स करणे. या दोन्ही गोष्टी त्वचेची दुरुस्ती आणि पोषण करू शकतात. हे तुम्हाला तेजस्वी चमक देऊ शकतात. हा पॅक बनवण्यासाठी २ चमचे मध घ्या आणि नंतर त्यात २ चमचे गुलाब जल घाला. हे चांगले मिक्स करुन घ्या. आता हा पॅक तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. १० मिनिटे राहू द्या आणि नंतर नीट धुवा.

 

कच्च्या पपईचा फेस पॅक

कच्च्या पपईचा फेस पॅक असमान त्वचा असलेल्यांसाठी फायदेशीर आहे. यात विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे तुमच्या निस्तेज आणि कोरड्या त्वचेला पोषण देतात आणि उजळ करतात. कच्चे दूध हे व्हिटॅमिन ईचे समृद्ध स्त्रोत आहे. हे कोरड्या त्वचेला खोलवर हायड्रेट करते आणि शांत करते. हे वापरून तुम्ही हिवाळ्यात कोरड्या त्वचेपासून मुक्ती मिळवू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner