मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Home Remedies: पांढरे केस काळे करण्याचे टेन्शन सोडा, फॉलो करा या नॅचरल पद्धती

Home Remedies: पांढरे केस काळे करण्याचे टेन्शन सोडा, फॉलो करा या नॅचरल पद्धती

Jan 03, 2023, 02:17 PM IST

    • Hair Care Tips: वाढत्या वयाबरोबर केस पांढरे होणे सामान्य आहे. पण जर तुमचे केस वयाच्या आधी पांढरे होत असतील तर सर्वप्रथम टेन्शन घेणे बंद करा. तुम्ही येथे सांगितलेले काही सोपे घरगुती उपाय फॉलो करुन पांढरे केस काळे करु शकता.
पांढरे केस काळे करण्यासाठी नॅचरल पद्धती

Hair Care Tips: वाढत्या वयाबरोबर केस पांढरे होणे सामान्य आहे. पण जर तुमचे केस वयाच्या आधी पांढरे होत असतील तर सर्वप्रथम टेन्शन घेणे बंद करा. तुम्ही येथे सांगितलेले काही सोपे घरगुती उपाय फॉलो करुन पांढरे केस काळे करु शकता.

    • Hair Care Tips: वाढत्या वयाबरोबर केस पांढरे होणे सामान्य आहे. पण जर तुमचे केस वयाच्या आधी पांढरे होत असतील तर सर्वप्रथम टेन्शन घेणे बंद करा. तुम्ही येथे सांगितलेले काही सोपे घरगुती उपाय फॉलो करुन पांढरे केस काळे करु शकता.

Natural Home Remedies to Get Black Hair: केस पांढरे होणे ही खूपच सामान्य समस्या झाली आहे. वाढत्या वयाबरोबर प्रत्येकाचे केस पांढरे होतात. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. वयाच्या ३५ नंतर केस पांढरे होणे सामान्य आहे. मात्र आजकाल २० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांचे केसही पांढरे होऊ लागतात. यामागे अनुवांशिक, एखादा आजार किंवा चुकीची लाइफस्टाईल असू शकते. वाढत्या वयाच्या बाबतीत असे मानले जाते की एकदा ते पांढरे झाले की ते नैसर्गिकरित्या काळे होऊ शकत नाही. दुसरीकडे, काही तज्ञांचे मत आहे की जर तुमचे केस वेळेआधी पांढरे होत असतील तर त्याचे कारण शोधून त्यावर नियंत्रण ठेवता येते.

ट्रेंडिंग न्यूज

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

- जर तुम्ही तरुण असाल आणि तुमचे केस पांढरे होत असतील तर सर्वप्रथम तुमच्या लाइफस्टाईलकडे लक्ष द्या. व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन बी- १२, बायोटिन, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन ए.या जीवनसत्त्वांमुळे केस निरोगी राहतात. तसेच कॉपर, सेलेनियम, मॅग्नेशियम, लोह, जस्त हे देखील महत्त्वाचे आहेत.

- यासाठी मल्टीविटामिन्स घेणे आवश्यक नाही. फळे, नट्स, सुका मेवा आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करा.

- सकाळी उठून आवळा खा. आले किसून त्यात मध मिक्स करुन खावे.

- खोबरेल तेलाने केसांना मसाज करा. सकाळी केस धुवा. हे तेल गुसबेरीमध्ये उकळवा आणि नंतर ते केसांना लावा.

- आठवड्यातून दोन ते तीन वेळा एक चमचा काळे तीळ खा.पांढरे केस पुन्हा काळे होतात असा समज आहे.

- अनेक रिसर्चमध्ये हे समोर आले आहे की केस पांढरे होण्याचे सर्वात मोठे कारण ताणतणाव आहे. तुम्ही तणाव कमी करा. आनंदी रहा तुमच्या लुकमध्ये तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)

 

विभाग

पुढील बातम्या