मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hair Oil: हिवाळ्यात हेअर केअरसाठी बनवा हे तेल, केसांच्या अनेक समस्यांची होईल सुट्टी

Hair Oil: हिवाळ्यात हेअर केअरसाठी बनवा हे तेल, केसांच्या अनेक समस्यांची होईल सुट्टी

Dec 21, 2022, 05:17 PM IST

    • Winter Hair Care: हिवाळ्यात केसांच्या अनेक समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत या ऋतूत घरगुती तेलाचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते. जाणून घ्या हे तेल कसे बनवायचे.
होममेड हेअर ऑइल

Winter Hair Care: हिवाळ्यात केसांच्या अनेक समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत या ऋतूत घरगुती तेलाचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते. जाणून घ्या हे तेल कसे बनवायचे.

    • Winter Hair Care: हिवाळ्यात केसांच्या अनेक समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत या ऋतूत घरगुती तेलाचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते. जाणून घ्या हे तेल कसे बनवायचे.

Homemade Hair Oil: हिवाळ्यात डँड्रफ आणि हेअर फॉलचा बहुतेकांना त्रास होतो. या सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी अनेकदा केसांना तेल लावण्याचा सल्ला दिला जातो. पण केसांना कोणते तेल लावायचे हा प्रश्न नेहमीच पडतो. जर तुम्ही सुद्धा याबाबत कंफ्यूज असाल तर घरी एक उत्तम तेल बनवून ठेवू शकता. हे तेल तुमच्या केसांच्या अनेक समस्या दूर करू शकते. ते कसे बनवायचे ते पहा

ट्रेंडिंग न्यूज

Kedarnath Yatra: केदारनाथच्या आजूबाजूला आहेत ही सुंदर ठिकाणं, ती पाहिल्याशिवाय अपूर्ण राहील ट्रीप

Onion Pickle: जेवणासोबत सर्व्ह करा टेस्टी कांद्याचे लोणचे, प्रत्येक जण विचारेल रेसिपी

High Blood Pressure: अनियंत्रित रक्तदाबामुळे होऊ शकतात या समस्या, वेळीच घ्या काळजी

Health Tips: तेल वारंवार गरम केल्याने वाढतो कर्करोगाचा धोका, आयसीएमआरचा इशारा, किती दिवस जुने तेल वापरता येते?

घरी हेअर ऑइल बनवण्यासाठी साहित्य

खोबरेल तेल - १ लीटर

कढीपत्ता - २५ ते ३०

मेथी दाणे - १ टीस्पून

जास्वंदाची फुले - १५ ते २०

कडुलिंबाची पाने - २५ ते ३०

कांदे - ३ मध्यम आकाराचे

कोरफडीचे पान - १ मध्यम आकाराचे

चमेलीची फुले - १५ ते २०

कसे बनवावे हेअर ऑइल

हे तेल बनवण्यासाठी प्रथम मेथी दाणे अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा आणि तोपर्यंत कोरफडीचे छोटे तुकडे करा. मेथी दाणे चांगले भिजल्यावर सर्वगोष्टी एकत्र बारीक करा. आता शुद्ध खोबरेल तेल गरम करून त्यात ही पेस्ट घाला. रंग बदलेपर्यंत सुमारे ४५मिनिटे कमी गॅसवर गरम करा. नंतर थंड होऊ द्या आणि गाळून काचेच्या बाटलीत ठेवा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग

पुढील बातम्या