मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Bridal Hair Care: लग्नाच्या आधी की नंतर, नवरीने कधी करावे हेअर ट्रीटमेंट? जाणून घ्या

Bridal Hair Care: लग्नाच्या आधी की नंतर, नवरीने कधी करावे हेअर ट्रीटमेंट? जाणून घ्या

Dec 13, 2022, 01:51 PM IST

    • लग्नाआधी ब्राइड तिच्या प्री-ब्राइडल पॅकेजमध्ये विविध स्किन आणि हेअर ट्रीटमेंट करून घेतात. पण लग्नाआधी हेअर ट्रिटमेंट करणं खरंच योग्य आहे का? येथे जाणून घ्या.
हेअर ट्रीटमेंट (unsplash)

लग्नाआधी ब्राइड तिच्या प्री-ब्राइडल पॅकेजमध्ये विविध स्किन आणि हेअर ट्रीटमेंट करून घेतात. पण लग्नाआधी हेअर ट्रिटमेंट करणं खरंच योग्य आहे का? येथे जाणून घ्या.

    • लग्नाआधी ब्राइड तिच्या प्री-ब्राइडल पॅकेजमध्ये विविध स्किन आणि हेअर ट्रीटमेंट करून घेतात. पण लग्नाआधी हेअर ट्रिटमेंट करणं खरंच योग्य आहे का? येथे जाणून घ्या.

What is the Right Time for Hair Treatment: भारतीय संस्कृतीनुसार लग्न म्हणजे स्त्रीच्या जीवनात मोठा बदल घडून येतो. प्रत्येक स्त्रीला या प्रसंगी सर्वात सुंदर वधू दिसण्याची इच्छा असते. यासाठी लग्नाच्या काही महिन्यांपूर्वी नवरीसाठी ग्रूमिंग सेशन सुरू होते. त्वचेसोबतच महिला या खास सोहळ्यासाठी केसांची ट्रीटमेंटही घेतात. या हेअर ट्रीटमेंटमध्ये काही जण स्पा करतात तर काही केसांवर केराटिन करतात. पण खरंच लग्नाआधी करावं का? जर तुमचे लग्न लवकरच होणार आहे, तर येथे जाणून घ्या उत्तर.

ट्रेंडिंग न्यूज

Kedarnath Yatra: केदारनाथच्या आजूबाजूला आहेत ही सुंदर ठिकाणं, ती पाहिल्याशिवाय अपूर्ण राहील ट्रीप

Onion Pickle: जेवणासोबत सर्व्ह करा टेस्टी कांद्याचे लोणचे, प्रत्येक जण विचारेल रेसिपी

High Blood Pressure: अनियंत्रित रक्तदाबामुळे होऊ शकतात या समस्या, वेळीच घ्या काळजी

Health Tips: तेल वारंवार गरम केल्याने वाढतो कर्करोगाचा धोका, आयसीएमआरचा इशारा, किती दिवस जुने तेल वापरता येते?

लग्नाआधी हेअर ट्रिटमेंट करावी का?

लग्नापूर्वी मुली हेअर केराटीन, स्मूथिंग करतात. तसे तर या सर्व ट्रीटमेंटमुळे केस सुंदर होतात. पण लग्नाआधी ते करून घ्यायचे म्हटले तर उत्तर नाहीच येईल. जर तुम्ही लग्नाआधी केसांची कोणतीही ट्रिटमेंट करण्याचा विचार करत असाल तर ते लग्नानंतर पुढे ढकला.

का करु नये हेअर ट्रीटमेंट

हेअर ट्रीटमेंटचे काम तुमचे केस मऊ आणि चमकदार बनवणे आहे. यासोबतच केसांच्या समस्या दूर करण्यासाठी देखील काही हेअर ट्रीटमेंट केले जातात. अशा परिस्थितीत लग्नात हेअर स्टायलिंग करण्यासाठी केसांना पावडर आणि बॅक कोम्बच्या मदतीने केस रफ केले जातात. जे तुमचे केस खराब करू शकतात. याशिवाय केसांवरील हीट मुळे देखील केस खराब होऊ शकतात. अशा स्थितीत लग्नानंतर केसांची ट्रीटमेंट घेणे योग्य ठरेल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग

पुढील बातम्या