मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mango Kulfi: आंबा प्रेमींनी जरूर ट्राय करावी ही मँगो कुल्फीची रेसिपी, आहे खूप सोपी

Mango Kulfi: आंबा प्रेमींनी जरूर ट्राय करावी ही मँगो कुल्फीची रेसिपी, आहे खूप सोपी

May 11, 2023, 09:53 PM IST

    • Summer Special Recipe: उन्हाळ्याची मजा द्विगुणित करायची असेल तर कुल्फी हा उत्तम पर्याय आहे. ते सुद्धा सगळ्यांची आवडती मँगो कुल्फी. मँगो कुल्फी ही बनवायला खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे.
मँगो कुल्फी (pixabay)

Summer Special Recipe: उन्हाळ्याची मजा द्विगुणित करायची असेल तर कुल्फी हा उत्तम पर्याय आहे. ते सुद्धा सगळ्यांची आवडती मँगो कुल्फी. मँगो कुल्फी ही बनवायला खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे.

    • Summer Special Recipe: उन्हाळ्याची मजा द्विगुणित करायची असेल तर कुल्फी हा उत्तम पर्याय आहे. ते सुद्धा सगळ्यांची आवडती मँगो कुल्फी. मँगो कुल्फी ही बनवायला खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे.

Mango Kulfi Recipe: आंबाप्रेमी वर्षभर उन्हाळ्याची वाट पाहत असतात. गोड, रसाळ आंबा खाण्याचा एकही दिवस आंबाप्रेमी चुकवत नाहीत. जर तुम्ही आंबा प्रेमींपैकी एक असाल तर तुम्ही ही मँगो कुल्फी रेसिपी जरूर ट्राय करा. लहान मुलांसोबतच मोठ्यांना सुद्धा घरच्या घरी बनवलेली थंड थंड कुल्फी खूप आवडेल. चला तर मग जाणून घेऊया कशी बनवायची खास मँगो कुल्फी, ही आहे झटपट रेसिपी.

ट्रेंडिंग न्यूज

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

joke of the day : तू अजून लग्न का केलं नाहीस, असं जेव्हा कोकिळा कावळ्याला विचारते…

Mango Lassi Recipe: उन्हाळ्याच्या दिवसांत ट्राय करा ७ प्रकारची मँगो लस्सी! मूडही फ्रेश होईल अन् शरीर थंड राहील!

International Museum Day 2024: का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन? जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि थीम

Mother's Day Recipe: आईसाठी झटपट बनवा रबडी केक, गोडव्यासोबत मिळेल थंडावा

मँगो कुल्फी बनवण्यासाठी साहित्य

- २-३ आंब्याचे तुकडे

- १ कप दूध

- १/४ वाटी घट्ट क्रीम

- १/२ कप कंडेन्स्ड मिल्क

- १/२ टीस्पून वेलची पावडर

- ३ चमचे मिल्क पावडर

- १/४ चमचे केवडा पाणी

- ८-९ केशर

- गार्निशिंगसाठी बारीक चिरलेला पिस्ता

Missi Roti बनवण्याची आहे ही नवीन पद्धत, लंच असो वा डिनर झटपट होईल तयार

मँगो कुल्फी बनवण्याची कृती

कुल्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम पिकलेले आंबे कापून त्याची प्युरी बनवा. आता दूध, मलई घालून मिक्सरमध्ये मिक्स करा. नंतर त्यात कंडेन्स्ड मिल्क आणि मिल्क पावडर घाला. आणि पुन्हा मिक्सरमध्ये ब्लेंड करा. आता या कुल्फीच्या मिश्रणात केवड्याचे पाणी आणि वेलची पूड, केशर टाका. पुन्हा चांगले ब्लेंड करा. मिक्सरमध्ये दोन ते तीन वेळा ब्लेंड केल्याने कुल्फीचे मिश्रण पूर्णपणे गुळगुळीत होईल आणि त्यात गुठळ्या राहणार नाहीत. जर तुम्हाला त्याचा गोडवा वाढवायचा असेल तर तुम्ही साखर पावडर मिक्स करून पुन्हा एकदा ब्लेंड करू शकता. किंवा तुम्ही तुमचे आवडते ड्राय फ्रूट्स देखील घालू शकता. जेणेकरून कुल्फीची टेस्ट थोडी क्रंची होईल.

Summer Special: उन्हाळ्यात लिंबूपाणी नाही तर ट्राय करा मसाला कुकुंबर लेमोनेड, खास आहे शेफ कुणालची ही रेसिपी

आता हे कुल्फीच्या साच्यात घाला आणि साधारण ७-८ तास सेट होण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवा. सेट झाल्यावर त्यावर बारीक चिरलेल्या पिस्त्याने सजवा आणि सर्व्ह करा.

विभाग

पुढील बातम्या