मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  International Mathematics Day: या सोप्या ट्रिक्सने मुलांना लावा गणिताची गोडी, भीती होईल दूर

International Mathematics Day: या सोप्या ट्रिक्सने मुलांना लावा गणिताची गोडी, भीती होईल दूर

Mar 14, 2023, 11:40 AM IST

    • Parenting Tips: दैनंदिन काम करताना मुलांना काही गोष्टी शिकवल्या तर ते सहज शिकतात. हीच बाब गणिताच्या बाबतीत देखील लागू पडते. मुलांना काही सोप्या ट्रिक्सने तुम्ही गणिताची गोडी लावू शकता.
मुलांना गणित शिकवण्यासाठी सोप्या ट्रिक्स (unsplash)

Parenting Tips: दैनंदिन काम करताना मुलांना काही गोष्टी शिकवल्या तर ते सहज शिकतात. हीच बाब गणिताच्या बाबतीत देखील लागू पडते. मुलांना काही सोप्या ट्रिक्सने तुम्ही गणिताची गोडी लावू शकता.

    • Parenting Tips: दैनंदिन काम करताना मुलांना काही गोष्टी शिकवल्या तर ते सहज शिकतात. हीच बाब गणिताच्या बाबतीत देखील लागू पडते. मुलांना काही सोप्या ट्रिक्सने तुम्ही गणिताची गोडी लावू शकता.

Simple Tricks for Teaching Maths to Kids: लहान मुलांना गणित शिकवणे खूप सोपे आहे. त्यासाठी पेन, पेन्सिल आणि कागदाची गरज नाही. तर त्याच्या पलीकडे जाऊन ते एक अनुभव बनवा जे मुलांसाठी मनोरंजक असेल. काही छोट्या छोट्या गोष्टींमुळे मुलं हसत खेळत गणित शिकतील. जाणून घ्या या सोप्या ट्रिक्स.

ट्रेंडिंग न्यूज

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

मुलांना गणित शिकवण्याच्या सोप्या ट्रिक्स

काउंटिंगने सुरुवात करा

गणिताची ओळख ही संख्या जाणून घेण्यापासून होते. तुम्ही त्यांना संख्या शिकवण्यासाठी एक ते दहा आकडे कसे मोजायचे हे शिकवू शकता. यात मुलांना तुमच्या नंतर तसेच म्हणायला किंवा मोजायला सांगा. यामुळे ते संख्या आणि काउंटिंग कसे करतात हे शिकतील. हळू हळू तुम्ही त्यात बेरिज व वजाबाकी शिकवू शकता.

रोजच्या वस्तू वापरा

तुमच्या मुलांना गणित शिकवण्यासाठी तुमच्या घरातील वस्तूंचा वापर करा. यात रोजच्या वापरातील अनेक गोष्टींची मदत घेता येते. जसे घरातील व्यक्ती किती आहेत, घरातील वस्तू, मुलांकडे असलेल्या खेळणे किती आहेत, बटण, पैसे, पुस्तके, फळे, कार, चमचे अशा कितीतरी वस्तूंसोबत तुम्ही त्यांना काउंटिंग शिकवू शकता. यात तुम्ही त्यांना बेरिज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अगदी सोप्या पद्धतीने सांगू शकता. दैनंदिन वस्तू त्यांना हे शिकवण्यात मदत करतात की गणितात वस्तू एकसारख्या असणे आवश्यक नाही. जसे फळे मोजताना सफरचंद, संत्री, टरबूज अशा सगळे एकत्र मोजता येतात.

गणिताचे खेळ

बाजारात असे बरेच गेम आहेत जे तुम्हाला गणित शिवण्यात मदत करतात. सापशिडी मुलांना १ ते १०० पर्यंतचे आकड्यांची ओळख करु देते. तर लुडो, बिझनेस सारखे गेम मुलांना बेरिज, वजाबाकी, व्यवहार शिकवतात. तुम्ही घरच्या घरी सुद्धा काही गेम डिझाईन करु शकता. जसे पायऱ्यांवर आकडे लिहून मुलांना बेरिज वजाबाकी शिकवता येते. शिवाय त्यांच्या खेळण्यातील ब्लॉक्सचा देखील यात वापर करता येतो.

कुकीज बेक करणे

हे मुलांना अपूर्णांक शिकवण्यात मदत करतात. मुलांना कुकिंज बनवताना अर्धे, एक चतुर्थांश, एक तृतियांश हे कापून शिकवता येते. यामुळे मुलांना अपूर्णांक कसे जोडायचे आणि वजा करायचे हे शिकता येते.

गणिताला डेली अॅक्टिव्हिटी करा

तुमच्या दैनंदिन रुटीनमध्ये गणिताचा वापर करा. गणिताचे धडे दैनंदिन जीवनात समाविष्ट करुन ते साध्य करु शकतील असे उद्दीष्ट सेट करा. जसे सिग्नला थांबले असताना लाल रंगाच्या किती गाड्या दिसत आहेत, जर भाजी ३० रुपयांची झाली आणि तुम्ही दुकानदाराला ५० रुपये दिले तर किती पैसे परत घ्यायचे, जर तुम्ही तुमचा टिफीन फक्त एक चतुर्थांग खाल्ला असेल तर त्यात किती शिल्लक राहिलं, वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुताना किती शर्ट टाकले, एक पिझ्झा जर ५ लोकांना खायचा असेल तर प्रत्येकाच्या वाट्याला किती भाग येणार असे छोटे छोटे उदाहरणांनी मुलांना गणिताची आवड निर्माण होईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

पुढील बातम्या