मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  इव्हनिंग स्नॅक्स असो वा स्टार्टर, परफेक्ट आहे मशरूम फ्राय, नोट करा ही रेसिपी

इव्हनिंग स्नॅक्स असो वा स्टार्टर, परफेक्ट आहे मशरूम फ्राय, नोट करा ही रेसिपी

Mar 13, 2023, 05:25 PM IST

    • संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी स्नॅक्स खायला सगळ्यांनाच आवडतात. तुम्ही सुद्धा काही वेगळं खायचा विचार करत असाल तर मशरूम फ्राय बनवा.
मशरूम फ्राय (freepik)

संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी स्नॅक्स खायला सगळ्यांनाच आवडतात. तुम्ही सुद्धा काही वेगळं खायचा विचार करत असाल तर मशरूम फ्राय बनवा.

    • संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी स्नॅक्स खायला सगळ्यांनाच आवडतात. तुम्ही सुद्धा काही वेगळं खायचा विचार करत असाल तर मशरूम फ्राय बनवा.

Mushroom Fry Recipe: संध्याकाळची भूक भागवण्यासाठी चहासोबत हलका नाश्ता बनवला जातो. जर तुम्ही सुद्धा अशाच नाश्त्याची रेसिपी शोधत असाल, जी टेस्टमध्ये चटपटीत आणि आरोग्यासाठी फायदेशीर असेल, तर मशरूम फ्रायची ही चविष्ट रेसिपी करून पहा. चवीला उत्तम असण्यासोबतच ही रेसिपी पटकन तयार सुद्धा होते. विशेष म्हणजे तुम्ही हे स्टार्टर म्हणून सुद्धा सर्व्ह करु शकता.

ट्रेंडिंग न्यूज

National Anti-Terrorism Day: राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन २१ मे रोजी का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

International Tea Day 2024: चहाचे हे ५ प्रकार आहेत आपल्या आरोग्यासाठी उत्तम, तुम्ही ट्राय केलेत का?

Yoga Mantra: ही योगासनं नियमित केल्याने दूर होईल शरीरातील रक्ताची कमतरता, चुकवू नका

Mango Jam: घरच्या घरी झटपट बनवा आंबट गोड मँगो जॅम, मुलांसह मोठ्यांना आवडेल ही रेसिपी

मशरूम फ्राय बनवण्यासाठी साहित्य

- २५० ग्रॅम मशरूमचे तुकडे

- १ कांदा चिरलेला

- २-३ हिरव्या मिरच्या चिरलेल्या

- १/२ टीस्पून जिरे

- १/४ टीस्पून हळद

- १/४ टीस्पून काळी मिरी पावडर

- चिमूटभर गरम मसाला

- २ चमचे तेल

- चवीनुसार मीठ

मशरूम फ्राय बनवण्याची पद्धत

मशरूम फ्राय बनवण्यासाठी प्रथम कढईत तेल गरम करून त्यात कांदा सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. यानंतर हिरवी मिरची घाला, मशरूम घाला आणि मशरूम पाणी सुटेपर्यंत शिजवा. आता या स्टेजवर पॅनमध्ये जिरेपूड, हळद, मिरपूड, गरम मसाला आणि मीठ घालून मशरूम हलके सोनेरी होईपर्यंत शिजवा. तुमचे टेस्टी मशरूम फ्राय तयार आहे. संध्याकाळी चहासोबत याचा आस्वाद घेऊ शकता.

 

विभाग

पुढील बातम्या