मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Evening Snacks मध्ये बनवा मूग डाळ समोसा, केवळ टेस्टी नाही तर हेल्दीही आहे ही रेसिपी

Evening Snacks मध्ये बनवा मूग डाळ समोसा, केवळ टेस्टी नाही तर हेल्दीही आहे ही रेसिपी

Feb 04, 2023, 06:47 PM IST

    • संध्याकाळच्या नाश्त्यात काहीतरी नवीन ट्राय करायचा विचार करत असाल तर बनवा मूग डाळ समोसा. ही रेसिपी सोपी तर आहेच पण हेल्दी सुद्धा आहे.
मूग डाळ समोसा (pexels)

संध्याकाळच्या नाश्त्यात काहीतरी नवीन ट्राय करायचा विचार करत असाल तर बनवा मूग डाळ समोसा. ही रेसिपी सोपी तर आहेच पण हेल्दी सुद्धा आहे.

    • संध्याकाळच्या नाश्त्यात काहीतरी नवीन ट्राय करायचा विचार करत असाल तर बनवा मूग डाळ समोसा. ही रेसिपी सोपी तर आहेच पण हेल्दी सुद्धा आहे.

Moong Daal Samosa Recipe: जर तुम्हालाही संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी गरमा गरम आणि क्रिस्पी खायची इच्छा असेल तर तुम्ही हा टेस्टी मूग डाळ समोसा ट्राय करु शकता. मूग डाळ समोशाची ही रेसिपी खायला खूप चविष्ट तर आहेच पण बनवायलाही खूप सोपी आहे. चला तर मग वाट कसली पाहताय, जाणून घेऊया टेस्टी आणि हेल्दी मूग डाळ समोसा कसा बनवायचा.

ट्रेंडिंग न्यूज

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

मूग डाळ समोसा बनवण्यासाठी साहित्य

समोशाचा बाहेरील थर तयार करण्यासाठी

- २ कप मैदा

- १ चमचा मीठ

- २ चमचे तेल

- कणिक मळण्यासाठी पाणी

फिलिंग बनवण्यासाठी

- ३ कप धुतलेली मूग डाळ (३-४ तास पाण्यात भिजवून ठेवा)

- ३ टीस्पून गरम मसाला

- ३ टीस्पून लाल तिखट

- २ टीस्पून बडीशेप पावडर

- २ टीस्पून धने पावडर

- १ १/२ टीस्पून आमचूर पावडर

- २ टीस्पून तेल

- १ टीस्पून जिरे

- चीमूटभर हिंग

- चवीनुसार मीठ

मूग डाळ समोसाचे सारण बनवण्यासाठी -

मूग डाळ समोसाचे फीलिंग बनवण्यासाठी प्रथम मूग डाळ बारीक वाटून घ्या. आता एका पॅननध्ये २ चमचे तेल गरम करा आणि त्यात जिरे आणि हिंग घाला. तडतडायला लागल्यावर त्यात डाळ घाला आणि बाकीचे साहित्य घाला. हे मिश्रण मंद आचेवर भाजून घ्या. पूर्ण शिजल्यावर ते तव्याला चिकटणार नाही. मिश्रण गॅसवरून काढा आणि थंड होण्यासाठी ठेवा.

मूग डाळ समोसा बनवण्याची पद्धत

मूग डाळ समोसाचा बाहेरचा थर तयार करण्यासाठी सर्वप्रथम पिठात मीठ आणि तेल घालून कडक पीठ तयार करा आणि पाण्याच्या मदतीने मळून घ्या. आता ते १५ मिनिटे बाजूला ठेवा. आता पिठाचे छोटे छोटे गोळे करून गोलाकार लाटून अर्धे कापून घ्या. आता एक तुकडा घ्या आणि त्याच्या काठावर थोडेसे पाणी लावा आणि त्याचा शंकूच्या आकार करा. वरचा भाग चांगला दाबा आणि फिलिंग भरल्यानंतर बंद करा. समोसे तळण्यापूर्वी तेल पूर्णपणे गरम असावे. समोसे तेलात टाकल्यानंतर आच मंद करा आणि सोनेरी होईपर्यंत तळा.

 

विभाग

पुढील बातम्या