मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Weekend Special Recipe: नाश्त्यात बनवा गरमा गरम बटाटा उत्तपम, वीकेंडची करा हेल्दी सुरूवात

Weekend Special Recipe: नाश्त्यात बनवा गरमा गरम बटाटा उत्तपम, वीकेंडची करा हेल्दी सुरूवात

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 04, 2023 09:50 AM IST

Breakfast Recipe: दिवसाची सुरूवात चांगली झाली तर पूर्ण दिवस चांगला जातो. सकाळच्या नाश्त्यात हेल्दी बटाटा उत्तपम ट्राय करा. पहा ही सोपी आणि झटपट होणारी रेसिपी.

बटाटा उत्तपम
बटाटा उत्तपम

Potato Uttapam Recipe: जर तुम्हाला नाश्त्यासाठी काहीतरी हेल्दी आणि चविष्ट बनवायचे असेल तर बटाटा उत्तपमची ही टेस्टी रेसिपी ट्राय करा. या रेसिपीचे वैशिष्ट्य म्हणजे ही बनवायला खूप सोपी आहे आणि बनवायला जास्त वेळ लागत नाही. चला तर मग जाणून घेऊया सकाळची हेल्दी सुरुवात करण्यासाठी बटाटा उत्तपम कसा बनवायचा.

बटाटा उत्तपम बनवण्यासाठी साहित्य

- १ कप तांदूळ

- २ उकडलेले बटाटे

- १ कांदा तुकड्यांमध्ये कापलेले

- १ गाजर तुकड्यांमध्ये कापलेले

- १ कप कोबी बारीक चिरलेली

- १ शिमला मिरची, तुकड्यांमध्ये कापलेले

- २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेली

- २ चमचे आले बारीक चिरून

- १ टीस्पून लाल तिखट

- १ टीस्पून काळी मिरी

- चवीनुसार मीठ

बटाटा उत्तपम बनवण्याची पद्धत

बटाटा उत्तपम बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ ५ तास भिजत ठेवा. आता भिजवलेले तांदूळ, उकडलेले बटाटे, पाणी, आले आणि हिरव्या मिरच्या ब्लेंडरमध्ये टाका. बॅटर तयार झाल्यावर एका मोठ्या भांड्यात काढा आणि त्यात चिरलेली कोबी, गाजर, सिमला मिरची आणि कांदा, चिली फ्लेक्स, मीठ आणि काळी मिरी घाला आणि चांगले मिक्स करा. आता तवा गरम करा आणि तव्यावर एक पळी किंवा वाटीने बॅटर टाका आणि थोडेसे जाडसर पसरवा. दोन्ही बाजूंनी चांगले भाजून घ्या. तुमचा टेस्टी बटाटा उत्तपम सर्व्ह करायला तयार आहे.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग