मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Stuffed Cheese Tomatoes Recipe: ही चीज आणि टोमॅटोपासून बनवा टेस्टी डिश! नोट करा रेसिपी

Stuffed Cheese Tomatoes Recipe: ही चीज आणि टोमॅटोपासून बनवा टेस्टी डिश! नोट करा रेसिपी

Feb 04, 2023, 10:07 AM IST

    • Tea Time Snacks: ही डिश संध्याकाळच्या नाश्त्याची मजा द्विगुणित करेल.
स्नॅक्स रेसिपी (Freepik )

Tea Time Snacks: ही डिश संध्याकाळच्या नाश्त्याची मजा द्विगुणित करेल.

    • Tea Time Snacks: ही डिश संध्याकाळच्या नाश्त्याची मजा द्विगुणित करेल.

संध्याकाळच्या चहा सोबत अनेकांना काही तरी चटपटीत खायला आवडतं. दिवसभरातही अनेकदा आपल्याला छोटी छोटी भूक लागते तेव्हाही काही तरी हटके खायला आवडत. अशावेळी तुम्ही चीज टोमॅटो हा एक स्वादिष्ट नाश्ता बनवू शकता. ही डिश संध्याकाळच्या नाश्त्याची मजा द्विगुणित करेल. या चटकदार डिशसाठी काय साहित्य लागेल आणि याची रेसिपी कशी आहे ते जणूं घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

World Hypertension Day 2024: का साजरा केला जातो वर्ल्ड हायपरटेन्शन डे? जाणून घ्या इतिहास आणि यावर्षीची थीम

Ovarian Cancer: वेळेवर तपासणी केल्याने ओव्हेरियन कॅन्सरवर मात करणे शक्य, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Kadhi Recipe: उडीद आणि बेसन घालून बनवा छत्तीसगडची प्रसिद्ध कढी, झटपट तयार होते ही रेसिपी

Thick Eyelashes: पापण्या दाट आणि लांब करण्यासाठी करा हे उपाय, वाढेल डोळ्यांचे सौंदर्य

साहित्य

टोमॅटो

पनीर

मोझेरेला चीज

परमेसन चीज

ओरेगॅनो

चिली फ्लेक्स

कोथिंबीर

मीठ

तेल

कशी बनवायची ही डिश?

टोमॅटोचा वरचा भाग कापून बिया काढा.

आता टोमॅटोला थोडे तेल लावून ग्रीस करा.

आता किसलेले मोझेरेला चीज आणि परमेसन चीज एका भांड्यात ठेवा.

ओरेगॅनो, चिली फ्लेक्स, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घाला.

सर्व टोमॅटोमध्ये पनीर समान रीतीने भरून चांगले मिसळा.

प्रत्येक भरलेल्या टोमॅटोवर चिमूटभर काळी मिरी पावडर टाका.

आता टोमॅटो ग्रीस केलेल्या बेकिंग ट्रेवर ठेवा.

प्रीहिटेड ओव्हनमध्ये२२० डिग्री सेल्सिअसवर १०-१२ मिनिटे बेक करावे.

तुम्ही टोमॅटोला तूप लावलेल्या पॅनमध्ये सुद्धा टाकू शकता, झाकण ठेवून ते मऊ होईपर्यंत शिजवू शकता.

विभाग

पुढील बातम्या