मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Makhani Paneer Biryani Recipe: रेस्टॉरंट स्टाईल मखनी पनीर बिर्याणी बनवा घरीच, रेसिपी आहे सोपी!

Makhani Paneer Biryani Recipe: रेस्टॉरंट स्टाईल मखनी पनीर बिर्याणी बनवा घरीच, रेसिपी आहे सोपी!

Feb 21, 2023, 05:07 PM IST

    • आज स्वयंपाकघरात ठेवलेल्या या रोजच्या साहित्याने काहीतरी वेगळे बनवून बघा. 
मखनी पनीर बिर्याणी (Freepik )

आज स्वयंपाकघरात ठेवलेल्या या रोजच्या साहित्याने काहीतरी वेगळे बनवून बघा.

    • आज स्वयंपाकघरात ठेवलेल्या या रोजच्या साहित्याने काहीतरी वेगळे बनवून बघा. 

खरं तर, घरातील अनेकजण रोज तेच तेच पदार्थ रोज खाऊन कंटाळतात. विशेषतः लहान मुलांना फार नेहमी रोज काही तरी हवं असता. अशा परिस्थितीत वेळोवेळी रोजच्या जेवणात थोडी विविधता आणून काहीतरी वेगळे करून लहान मुलांची तसेच मोठ्यांना खुश करू शकता. भाजी भात जवळपास रोजच बनवला जातो. पण आज स्वयंपाकघरात ठेवलेल्या या रोजच्या साहित्याने काहीतरी वेगळे बनवून बघा. आज मखनी पनीर बिर्याणी करून पहा. मखनी पनीर बिर्याणी बनवण्याची ही सोपी रेसिपी आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

लागणारे साहित्य

२५० ग्रॅम पनीरचे चौकोनी तुकडे, २ चमचे संपूर्ण मसाला, ३ चमचे तूप, १ मोठा कांदा बारीक चिरलेला, ३ चमचे बटर, २ कप टोमॅटो प्युरी, २-३ हिरव्या मिरच्या, ३-४ लसूण, १ चमचे आले, एक टीस्पून तूर पावडर, १ चमचा जिरे-धने पावडर, १ चमचा तंदूरी मसाला, १/२ चमचा वेलची पावडर, १ चमचा साखर, १/४ कप काजू पेस्ट, १/२ कप मलई, चवीनुसार मीठ, ६ कप उकडलेला बासमती तांदूळ, १ भाजलेला कांदा, १/२ कप बदाम, १/२ कप पुदिना आणि कोथिंबीर

मखनी पनीर बिर्याणी कशी बनवायची?

> मखनी पनीर बिर्याणी बनवण्यासाठी प्रथम पनीरचे तुकडे तुपात टाका आणि वर हलका मसाले शिंपडा आणि बाजूला ठेवा.

> गॅसवर तवा ठेवा आणि त्यात दालचिनी, लवंगा, काळी वेलची, हिरवी वेलची, काळी मिरी असे अख्खे मसाले टाकून परतून घ्या.

> त्यानंतर पॅनमध्ये कांदा, हिरवी मिरची, आले आणि लसूण घालून दोन मिनिटे परतावे.

> नंतर त्यात टोमॅटो प्युरी घालून मंद आचेवर दहा मिनिटे शिजवा. सर्व मसाले आणि भाज्या शिजल्यानंतर त्यात काजूची पेस्ट आणि मलई घाला.

> आता कढईत बाजूला ठेवलेले पनीर टाका आणि मिक्स करा. मंद आचेवर सहा ते आठ मिनिटे शिजू द्या.

> तोपर्यंत बासमती तांदूळ उकडून घ्या. तांदूळ तीन ते चार वेळा चांगले धुवा. आता धुतलेल्या तांदळात पाणी टाका आणि ३० मिनिटे ठेवा. एका मोठ्या भांड्यात पाणी घाला, झाकून ठेवा आणि तांदूळ मध्यम आचेवर चांगले उकडून द्या. लक्षात ठेवा की जास्त पाणी ठेवा. जेव्हा तांदूळ उकडतो आणि बोटाने सहज मॅश होऊ लागतो तेव्हा मोठ्या चाळणीने गाळून प्लेटवर पसरवा. पाणी चांगले निघून जाऊ द्या.

> एक कांदा मंद आचेवर चांगला परतून घ्या.

> नंतर एका पॅनला तेलाने ग्रीस करा. त्यावर पनीर आणि तांदूळ एकत्र ठेवा. त्यावर तळलेले कांदे आणि कोथिंबीर टाका आणि २०-२५ मिनिटे मंद आचेवर झाकून ठेवा.

 

पुढील बातम्या