मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Masala Onion Roti Recipe: नाश्त्यात बनवा चविष्ट मसाला कांदा पराठा, सगळेच करतील कौतुक!

Masala Onion Roti Recipe: नाश्त्यात बनवा चविष्ट मसाला कांदा पराठा, सगळेच करतील कौतुक!

Feb 21, 2023, 09:44 AM IST

    • Breakfast Recipes: नेहमीच्या नाश्त्याचा कंटाळा आला असेल आणि मेनूमध्ये काही बदल करायचे असतील तर तुम्ही हा पराठा ट्राय करू शकता
मसाला कांदा पराठा (Freepik )

Breakfast Recipes: नेहमीच्या नाश्त्याचा कंटाळा आला असेल आणि मेनूमध्ये काही बदल करायचे असतील तर तुम्ही हा पराठा ट्राय करू शकता

    • Breakfast Recipes: नेहमीच्या नाश्त्याचा कंटाळा आला असेल आणि मेनूमध्ये काही बदल करायचे असतील तर तुम्ही हा पराठा ट्राय करू शकता

मसाला कांदा पराठ्याची चव खूप हटके लागते. चविष्ट मसाला कांदा पराठा हेवी नाश्त्या म्हणून एक उत्तम पर्याय आहे. जर तुम्हाला नेहमीच्या नाश्त्याचा कंटाळा आला असेल आणि मेनूमध्ये काही बदल करायचे असतील तर तुम्ही हा पराठा ट्राय करू शकता. मसाला कांदा पराठा मुलांच्या जेवणाच्या डब्यातही देता येऊ शकतो. हा पराठा बनवायला खूप सोपा आहे आणि खाणारे त्याचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत. चला जाणून घेऊया मसाला कांदा पराठा बनवण्याची सोपी पद्धत.

ट्रेंडिंग न्यूज

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

लागणारे साहित्य

गव्हाचे पीठ - १ कप

बेसन - १/२ कप

बारीक चिरलेला कांदा - ३/४ कप

हिरवी मिरची - १

कोथिंबीर - १ टीस्पून

जिरे - १/२ टीस्पून

लाल तिखट - १/२ टीस्पून

हळद - १/४ टीस्पून

कांदा-लसूण मसाला - १/४ टीस्पून

देशी तूप - आवश्यकतेनुसार

मीठ - चवीनुसार

मसाला कांदा पराठा रेसिपी

> स्वादिष्ट मसाला कांदा पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम एक कांदा घ्या आणि त्याची साल काढून त्याचे बारीक तुकडे करा.

> यानंतर हिरव्या मिरच्या आणि हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.

> आता एक मोठा मिक्सिंग बाऊल घ्या आणि त्यात गव्हाचे पीठ आणि बेसन टाका आणि दोन्ही चांगले मिक्स करा. यानंतर जिरे, हळद, लाल तिखट घालून मिक्स करा. आता या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा घालून मिक्स करा.

> कांदे घातल्यानंतर मिश्रणात २ चमचे तेल टाका आणि त्यात कांदा-लसूण मसाला किंवा गरम मसाला घालून चांगले मिक्स करा.

> आता थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या. यानंतर, पीठ सेट होण्यासाठी १० मिनिटे झाकून ठेवा. ठरलेल्या वेळेनंतर पीठ घेऊन त्याचे गोळे बनवा.

> आता नॉनस्टिक तवा/तवा मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा. तवा गरम झाल्यावर त्यात थोडं तूप टाकून सगळीकडे पसरवा.

> आता कणकेचा गोळा घेऊन गोल लाटून घ्या आणि थोडा वेळ भाजून घ्या.

> नंतर पराठा पलटी करून वर थोडं तूप लावून भाजून घ्या. रोटी दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.

> यानंतर एका प्लेटमध्ये पराठा काढा. तुम्हाला हवे असल्यास तूप न लावताही पराठा भाजता येतो. हा पराठा लोणचं किंवा चटणीसोबत सर्व्ह करता येतो.

 

विभाग

पुढील बातम्या