मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kadhi Recipe: रात्रीच्या जेवणासाठी बनवा राजस्थानी कढी, भातासोबतही टेस्टी लागते ही रेसिपी

Kadhi Recipe: रात्रीच्या जेवणासाठी बनवा राजस्थानी कढी, भातासोबतही टेस्टी लागते ही रेसिपी

Mar 28, 2024, 08:32 PM IST

    • Dinner Recipe: रात्रीच्या जेवणात काही हलके खायचे असेल तर तुम्ही ही कढी बनवू शकता. जाणून घ्या राजस्थानी स्टाईल रेसिपी.
राजस्थानी कढी (freepik)

Dinner Recipe: रात्रीच्या जेवणात काही हलके खायचे असेल तर तुम्ही ही कढी बनवू शकता. जाणून घ्या राजस्थानी स्टाईल रेसिपी.

    • Dinner Recipe: रात्रीच्या जेवणात काही हलके खायचे असेल तर तुम्ही ही कढी बनवू शकता. जाणून घ्या राजस्थानी स्टाईल रेसिपी.

Rajasthani Kadhi Recipe: अनेक वेळा रात्रीच्या जेवणात भाजी पोळी खायची इच्छा नसते. हलके खायचे असेल तर खिचडी किंवा भाताचा विचार केला जातो. तुम्ही सुद्धा रात्रीच्या जेवणात खिचडी किंवा भात बनवण्याचा विचार करत असाल तर त्याच्यासोबत ही कढी बनवू शकता. राजस्थानी कढी खायला टेस्टी आहे तसेच बनवायला सोपी आहे. चला तर जाणून घ्या राजस्थानी कढी कशी बनवायची.

ट्रेंडिंग न्यूज

Mango Jam: घरच्या घरी झटपट बनवा आंबट गोड मँगो जॅम, मुलांसह मोठ्यांना आवडेल ही रेसिपी

Gallbladder Stone: पित्ताशयातील खडे आणि त्याबाबत आहेत अनेक गैरसमज, जाणून घ्या तज्ज्ञांकडून

Litchi Shake: उन्हाळ्यात काही खास प्यावेसे वाटत असेल तर बनवा लिची शेक, खूप सोपी आहे रेसिपी

Sandalwood Face Pack: उन्हाळ्यात घामोळ्या आणि पिंपल्सपासून आराम देईल चंदन, पाहा कसा बनवायचा फेस पॅक

राजस्थानी कढी बनवण्यासाठी साहित्य

- २ कप आंबट दही

- ४ कप पाणी

- ६ ते ७ टेबलस्पून बेसन

- अर्धा चमचा हळद

- चवीनुसार मीठ

- २ टेबलस्पून तूप

- अर्धा टीस्पून मोहरी

- १/४ टीस्पून मेथी दाणे

- अर्धा टीस्पून जिरे

- १ तमालपत्र

- १ चिमूटभर हिंग

- अर्धा चमचा लाल तिखट

- २ वाळलेल्या लाल मिरची संपूर्ण

राजस्थानी कढी बनवण्याची पद्धत

कढी बनवण्यासाठी आंबट दही, पाणी, बेसन आणि अर्धा चमचा हळद गुळगुळीत होईपर्यंत एकत्र करा. त्यात गुठळ्या राहू नये याची काळजी घ्या. नंतर मंद आचेवर पॅन ठेवा आणि त्यात हे द्रावण घाला. आता अधूनमधून ढवळत राहा आणि १५ ते २० मिनिटे बेसन शिजेपर्यंत आणि कढी थोडी घट्ट होईपर्यंत शिजवा. झाकण ठेवून बाजूला ठेवा. आता तडका तयार करा. यासाठी एका छोट्या कढईत तेल किंवा तूप गरम करा. नंतर मंद आचेवर तमालपत्रासह मोहरी घाला. मोहरी तडतडू द्या. नंतर त्यात जिरे आणि मेथी टाका. ढवळत असताना लाल मिरची आणि हिंग घाला. काही सेकंद भाजून घ्या. नंतर गॅस बंद करा. तिखट घालून मिक्स करा आणि लगेच हा तडका कढीवर घाला. ५ ते ६ मिनिटांनंतर गरमागरम राजस्थानी कढी भात किंवा खिचडीसोबत सर्व्ह करा.

पुढील बातम्या