Masala Vada: संध्याकाळच्या चहासोबत बनवा कर्नाटक स्पेशल मसाला वडा, नोट करा रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Masala Vada: संध्याकाळच्या चहासोबत बनवा कर्नाटक स्पेशल मसाला वडा, नोट करा रेसिपी

Masala Vada: संध्याकाळच्या चहासोबत बनवा कर्नाटक स्पेशल मसाला वडा, नोट करा रेसिपी

Mar 28, 2024 06:04 PM IST

Evening Snacks Recipe: संध्याकाळच्या चहासोबत काय खावे हा विचार करत असाल तर ही मसाला वडाची रेसिपी ट्राय करा. याची रेसिपी सोपी आहे.

कर्नाटक स्पेशल मसाला वडा
कर्नाटक स्पेशल मसाला वडा (freepik)

Karnataka Special Masala Vada Recipe: जर तुम्हाला संध्याकाळच्या चहासोबत रोज काहीतरी स्नॅक्स खायला आवडत असतील आणि काहीतरी चटपटीत खावेसे वाटत असेल तर स्नॅक्सची ही रेसिपी ट्राय करा. कर्नाटक स्पेशल मसाला वडा हा एक उत्तम स्नॅक्स पर्याय आहे, जो तुम्ही घरी सहज बनवू शकता. तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा तुमच्या आवडत्या सॉससोबत खाऊ शकता. हे वडे हरभरा डाळीपासून तयार केले जातात. हे वडे खायला टेस्टी आणि बनवायला सोपे आहेत. चला तर मग जाणून घ्या याची रेसिपी

मसाला वडा बनवण्यासाठी साहित्य

- हरभरा डाळ

- हिरवी मिरची

- बारीक चिरलेली कोथिंबीर

- कढीपत्ता

- बारीक चिरलेली पुदिन्याची पाने

- किसलेले आले

- तेल

- हळद

- मीठ

मसाला वडा बनवण्याची पद्धत

मसाला वडा बनवण्यासाठी प्रथम एक वाटी चणा डाळ नीट धुवून ३-४ तास भिजत ठेवा. पूर्ण भिजल्यावर मिक्सर ग्राइंडरमध्ये घेऊन त्यात हिरवी मिरची टाकून चांगली बारीक करून घ्या. त्याची बारीक पेस्ट बनवा. आता हे मिश्रण एका भांड्यात काढा आणि त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, हळद, मीठ, बारीक चिरलेली पुदिन्याची पाने आणि किसलेले आले घाला. हे संपूर्ण मिश्रण चांगले मिक्स करा. नंतर कढईत तेल गरम करा. तेल चांगले तापले की तयार मिश्रणातून गोल चपटे वडे करून तेलात टाका. कमीत कमी २ ते ३ मिनिटे चांगले तळा. जेव्हा ते सोनेरी तपकिरी होतात तेव्हा त्यांना तेलातून बाहेर काढा. तुमचे वडे तयार आहे. हिरवी चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा.

Whats_app_banner