Tomato, Onion and Pudina Chutney Recipe: भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये खाद्यसंस्कृती वेगळी आहे. काही ठिकाणी भात तर काही ठिकाणी भाकरी, पोळी खाल्ली जाते. तर दक्षिणेकडील शहरांमध्ये लोकांना इडली-वडा सारखे पदार्थ खायला आवडतात. या विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये एक गोष्ट सामान्य आहे ती म्हणजे चटणी. प्रत्येक जेवणासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या दिल्या जातात. भारतात ऋतूनुसार चटण्या बनवल्या जातात. उन्हाळ्यात जेव्हा लोकांना भाजी खायला आवडत नाही तेव्हा ते चटणीसोबत पोळी खातात. येथे आम्ही तुम्हाला कांदा आणि टोमॅटोपासून बनवलेल्या चविष्ट चटणीची रेसिपी सांगत आहोत. या चटणीचा तुम्ही जेवणासोबत आनंद घेऊ शकता. चला तर जाणून घ्या कशी बनवायची ही चटणी
- १ मोठा टोमॅटो
- १ मोठा कांदा
- ७-८ पाकळ्या लसूण
- मूठभर पुदिना,
- मूठभर कोथिंबीर
- आल्याचा तुकडा
- अर्धा चमचा जिरे पूड
- अर्धा छोटा चमचा चाट मसाला
- चवीनुसार मीठ
- १ किंवा २ हिरव्या मिरच्या
- अर्धा चमचा खटाई किंवा लिंबाचा रस
टोमॅटो कांद्याची चटणी बनवण्यासाठी प्रथम कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने स्वच्छ करा. नंतर नीट धुवून बाजूला ठेवा. आता टोमॅटो आणि कांदे धुवून घ्या. कांदा आणि लसूणची साल काढून टाका. कांदा आणि टोमॅटोचे तुकडे करा. आता तवा गरम करून त्यावर लसूण पाकळ्यांसह टोमॅटो आणि कांद्याचे तुकडे टाका. दोन्ही बाजूंनी चांगले भाजून घ्या. भाजून झाल्यावर ते विस्तवावरून उतरवा आणि नंतर थंड होऊ द्या. ते थंड झाल्यावर ब्लेंडरमध्ये टोमॅटो, कांदा, लसूण, कोथिंबीर, पुदिना सोबत सर्व मसाले घालून बारीक करून घ्या. ही चटणी थोडीशी जाडसर बारीक चांगली लागते. खूप बारीक पेस्ट करू नका. तुमची चटणी तयार आहे.