मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Oats Tikki: संध्याकाळच्या चहासोबत बनवा टेस्टी ओट्स टिक्की, खूप सोपी आहे रेसिपी

Oats Tikki: संध्याकाळच्या चहासोबत बनवा टेस्टी ओट्स टिक्की, खूप सोपी आहे रेसिपी

Mar 14, 2024, 05:07 PM IST

    • Evening Snacks Recipe: संध्याकाळी चहासोबत काही टेस्टी आणि हेल्दी खायचे असेल तर ओट्स टिक्कीची ही रेसिपी ट्राय करा. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे.
ओट्स टिक्की (freepik)

Evening Snacks Recipe: संध्याकाळी चहासोबत काही टेस्टी आणि हेल्दी खायचे असेल तर ओट्स टिक्कीची ही रेसिपी ट्राय करा. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे.

    • Evening Snacks Recipe: संध्याकाळी चहासोबत काही टेस्टी आणि हेल्दी खायचे असेल तर ओट्स टिक्कीची ही रेसिपी ट्राय करा. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे.

Oats Tikki Recipe: संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी चटपटीत खायला सर्वांनाच आवडते. पण अनेकदा स्नॅक्ससाठी टेस्टी आणि हेल्दी ऑप्शन शोधले जातात. तुम्हाला सुद्धा संध्याकाळी काही टेस्टी आणि हेल्दी खायची इच्छा असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. तुम्ही ओट्सपासून टेस्टी टिक्की बनवू शकता. ओट्स टिक्कीची ही रेसिपी टेस्टी तर आहेच पण बनवायलाही सोपी आहे. चला तर मग जाणून घ्या कशी बनवायची ओट्स टिक्की

ट्रेंडिंग न्यूज

Yoga Mantra: उन्हाळ्यात तुमचे शरीर थंड ठेवतील ही ३ योगासनं, जाणून घ्या फायदे आणि करण्याची योग्य पद्धत

Kedarnath Yatra: केदारनाथच्या आजूबाजूला आहेत ही सुंदर ठिकाणं, ती पाहिल्याशिवाय अपूर्ण राहील ट्रीप

Onion Pickle: जेवणासोबत सर्व्ह करा टेस्टी कांद्याचे लोणचे, प्रत्येक जण विचारेल रेसिपी

High Blood Pressure: अनियंत्रित रक्तदाबामुळे होऊ शकतात या समस्या, वेळीच घ्या काळजी

ओट्स टिक्की बनवण्यासाठी साहित्य

- ओट्सचे पीठ

- पनीर

- रताळे

- मिक्स भाज्या

- लाल शिमला मिरची

- कोबी

- कांदा

- बीन्स

- हिरवी मिरची

- आले

- कोथिंबीर

- लिंबू

- लाल तिखट

- हळद

- चाट मसाला

- सैंधव मीठ

- साधे मीठ

ओट्स टिक्की बनवण्याची पद्धत

ओट्स टिक्की बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात पनीर किसून घ्या. आता त्यात उकळलेले आणि मॅश केलेल्या रताळे घाला. त्यात आलं, मीठ, सैंधव मीठ, लाल तिखट, हळद, चाट मसाला, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घाला. नंतर बारीक चिरलेल्या सर्व भाज्या घाला. तुम्ही यात तुम्हाला आवडतात त्या सर्व भाज्या टाकू शकता. आता हे सर्व चांगले मिक्स करा. आता या मिश्रणाचा थोडासा गोळा घेऊन त्याला चापट आकार देऊन टिक्की तयार करा. आता एक नॉन-स्टिक पॅन गरम करून त्यावर थोडं तेल लावून ते नीट गरम होऊ द्या. तेल गरम झाल्यावर त्यात टिक्की टाका आणि दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या. तुम्ही ओट्स टिक्की सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

पुढील बातम्या