Sevai Fruit Custard Recipe: रमजान महिना हा अत्यंत पवित्र आणि भरभराट देणारा महिना मानला जातो, ज्यामध्ये अल्लाहची उपासना करण्याचा नियम सांगण्यात आला आहे. महिन्याभराच्या उपवासात दिवसभर उपाशी राहावे लागते. दिवसभर प्रतीक्षा केल्यानंतर इफ्तारच्या वेळी उपवास सोडला जातो. या काळात अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात. जर तुम्हालाही उपवासानंतर इफ्तारसाठी टेस्टी आणि हेल्दी रेसिपी बनवायची असेल तर शेवया फ्रूट कस्टर्डची ही रेसिपी ट्राय करा. हे बनवायला खूप सोपे आहे. जाणून घ्या हे कसे बनवायचे.
- शेवया - १/२ कप
- दूध - ५०० मिली
- व्हॅनिला कस्टर्ड - २ चमचे
- थंड दूध - १/२ कप
- साखर - १/४ कप
- केळी - २ (तुकडे)
- डाळिंबाचे दाणे - १ वाटी
- आंबा - १ वाटी (बारीक चिरून)
- काजू - ६ ते ७
- बदाम - ६ ते ७
- देशी तूप - २ चमचे
- केशर - १६ धागे
- वेलची पावडर - १/२ चमचा
शेवया फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी प्रथम कढईत शेवया नीट भाजून घ्या आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. त्यानंतर गॅसवर पॅन गरम करून त्यात दूध घालून २ ते ३ वेळा उकळू द्या. यानंतर दुधात केशर, वेलची पावडर, भाजलेली शेवया मिक्स करून आणखी ५ मिनिटे शिजवा. आता गॅसची आच मध्यम किंवा मंद ठेवा. आता एका भांड्यात कस्टर्ड पावडर टाका. त्यात ५ चमचे थंड दूध मिक्स करा. चमच्याने नीट ढवळून मिक्सर तयार करा. यानंतर शेवया शिजल्या आहेत की नाही ते तपासा. ते शिजल्यानंतर त्यात साखर, काजू, बदाम मिक्स करा. साखर विरघळल्यानंतर त्यात कस्टर्ड मिक्सर घाला. जेव्हा शेवया शिजायला लागतात आणि घट्ट आणि मलईदार होतात तेव्हा गॅस बंद करा आणि त्यांना थंड होऊ द्या.
आता आईस्क्रीमच्या ग्लासमध्ये या शेवया सर्व्ह करण्यापूर्वी त्यात डाळिंबाचे दाणे, केळीचे तुकडे, आंब्याचे तुकडे टाका आणि वर थंडगार कस्टर्ड शेवया घाला. यानंतर पुन्हा डाळिंबाचे दाणे टाका. शेवटी बदामाचे तुकडे आणि फ्रूट्सनी सजवा आणि सर्व्ह करा.