Shankarpali or Shakkar Pare Recipe: रंगांचा सण होळी येण्यापूर्वी प्रत्येक घरात विविध प्रकारचे फराळ तयार केले जातात. होळीच्या दिवशी वेळेवर स्नॅक्सचे पदार्थ बनवण्यासोबतच काही ड्राय स्नॅक्स सुद्धा आधीच बनवून ठेवले जातात. तुम्हाला सुद्धा स्नॅक्ससाठी आधीच काही बनवून ठेवायचे असेल तर शंकरपाळी बेस्ट पर्याय आहे. तुम्हाला परफेक्ट क्रिस्पी शंकरपाळी बनवायची असेल तर ही रेसिपी ट्राय करा. जाणून घ्या सोप्या पद्धतीने कसे बनवायचे.
- २ कप मैदा
- २ टेबलस्पून रवा
- ४ ते ५ टेबलस्पून तूप
- अर्धा कप साखर
- अर्धा कप पाणी
- चिमूटभर मीठ
- ४ कप तेल
हे बनवण्यासाठी पाणी गरम होऊ द्या आणि नंतर एका भांड्यात घाला. आता त्यात अर्धा कप साखर घाला आणि साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत चमच्याने ढवळत राहा. आता त्याच भांड्यात मैदा, रवा, मीठ आणि २ टेबलस्पून तूप घाला. आता ते चांगले मिसळा आणि घट्ट पीठ मळून घ्या. आवश्यक असल्यास पीठ मळून घेण्यासाठी थोडे पाणी किंवा दूध घाला. कुरकुरीत शंकरपाळी बनवण्यासाठी घट्ट पीठ बनवा. पीठ तयार झाल्यावर त्याचे २ समान भाग करा. दोन्ही भागांना एक गोलाकार आकार द्या आणि नंतर आपल्या तळहातामध्ये ठेवून ते सपाट करा. नंतर ते लाटण्याने अर्धा अर्धा इंच जाड लाटून घ्या. पीठ थोडे कडक असल्याने लाटताना कडा तुटतात. अशा स्थितीत कडा दाबून ते बंद करा आणि पुन्हा लाटा. आता धारदार चाकूने त्याचे चौकोनी आकाराचे छोटे तुकडे करा.
आता एका पॅनमध्ये तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर सर्व तयार केलेले शंकरपाळी तळून घ्या. तळून झाल्यावर टिश्यू पेपरवर काढून थंड होऊ द्या. नंतर एयरटाइट डब्यात ठेवा.