मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Moong Dal Chilla Recipe: नाश्त्यात बनवा मूग डाळ चिला, झटपट तयार होईल रेसिपी!

Moong Dal Chilla Recipe: नाश्त्यात बनवा मूग डाळ चिला, झटपट तयार होईल रेसिपी!

Apr 22, 2024, 09:53 AM IST

    • Breakfast Recipe: तुम्हाला सकाळी निरोगी आणि आरोग्यदायी नाश्ता करायचा असेल तर तुम्ही आवर्जून मूग डाळ चिला बनवून खा.
how to make Moong Dal Chilla (freepik)

Breakfast Recipe: तुम्हाला सकाळी निरोगी आणि आरोग्यदायी नाश्ता करायचा असेल तर तुम्ही आवर्जून मूग डाळ चिला बनवून खा.

    • Breakfast Recipe: तुम्हाला सकाळी निरोगी आणि आरोग्यदायी नाश्ता करायचा असेल तर तुम्ही आवर्जून मूग डाळ चिला बनवून खा.

Healthy Breakfast Recipe: सकाळचा नाश्ता महत्त्वाचा असतो. सकाळीसाठी हेल्दी आणि चविष्ट नाश्ताचे पदार्थ शोधत असतात. याचसाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय चविष्ट मूग डाळ चील्याची रेसिपी. लहान मुलं असोत की मोठी, मुगाची डाळ खायला अनेकांना आवडत नाही. पण तुम्ही यापासून हटके रेसिपी बनवू शकता. डाळीपासून एकदा चीला बनवला तर सगळ्यांना नक्कीच आवडेल. तसेच मूग डाळ आरोग्यासाठी उत्तम आहे. अशा परिस्थितीत सकाळी घरीच हा सोपा मूग डाळ चीला बनवा. ही डिश इतकी टेस्टी आहे की, हा चीला तुम्ही इतर कशापासून नाही तर मूग डाळीपासून बनवला आहे हे कोणालाही कळणार नाही. चला चिला बनवण्याची झटपट रेसिपी जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

Pakora Recipe: क्रिस्पी लच्छा पकोडे बनवण्याची सोपी रेसिपी, संध्याकाळच्या चहाची मजा होईल डबल

Dull Skin Care: घाम आणि धुळीमुळे त्वचा निस्तेज झाली का? उपयुक्त ठरेल काकडीचा फेस पॅक

Fitness Mantra: तुमचे वजन जास्त असेल तर करा हे पायांचे व्यायाम, सोपे होईल वेट लॉस

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

लागणारे साहित्य

हिरवी साल असलेली मूग डाळ - पाण्यात भिजवलेली, ४-५ लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या, हिंग, चवीनुसार मीठ, शुद्ध तेल

Soya Chunks Cutlets: नाश्त्यात बनवा सोया चंक्सपासून कटलेट, नोट करा टेस्टी आणि आरोग्यदायी रेसिपी!

जाणून घ्या कृती

> सर्वप्रथम भिजवलेली मूग डाळ घ्या आणि पाण्याने नीट धुवा.डाळ ४ ते ५ तास भिजवून ठेवल्यानंतर डाळ फुगते आणि डाळ साले वेगळी होते. पाण्याने धुताना सर्व साले आणि डाळ वेगवेगळे करून घ्या.

> यानंतर डाळी मिक्सरच्या भांड्यात टाका. मिक्सरच्या भांड्यात अगदी थोडे पाणी, किमान ४ ते ५ चिरलेल्या हिरव्या मिरच्या, ४ ते ५ पाकळ्या लसूण टाका आणि मग मिक्सरची भांडी बंद करून पुन्हा बारीक करा.

Sweet Roti Recipe: नाश्त्यात बनवा गोड रोटी, झटपट तयार होणारी रेसिपी जाणून घ्या!

> डाळ बारीक झाल्यावर एका भांड्यात काढून हाताने ५ ते ८ मिनिटे फेटून घ्या. यानंतर डाळीत चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हिंग घालून मिक्स करा. आता तुमची डाळ चीला बनवायला तयार आहे.

> आता गॅसवर पॅन मंद आचेवर ठेवा. यासाठी तुम्ही नॉनस्टिक किंवा कोणतेही सामान्य पॅन घेऊ शकता. तव्यावर थोडे रिफाइंड तेल टाका आणि गरम होऊ द्या.

> आता डाळीचे मिश्रण एका लहान वाडग्यात किंवा खोलगट लाडू घेऊन तव्याच्या मधोमध ओतून हलक्या हाताने पसरवा.

Fruit Yogurt: शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी नाश्त्यात खा फ्रुट योगर्ट, प्रोटीनची कमतरता भासणार नाही!

> यानंतर चिल्याभोवती थोडेसे तेल घाला. एक बाजू हलकी तपकिरी झाली की, चीला स्पॅटुला लावून फिरवा.

> आता ही बाजूही मंद आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवा.

> दोन्ही बाजूंनी हलका सोनेरी तपकिरी शिजल्यावर चीला प्लेटमध्ये काढून घ्या.

पुढील बातम्या