मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Amras Recipe: ताज्या आणि रसाळ आंब्यापासून झटपट बनवा आमरस, जाणून घ्या टेस्टी रेसिपी

Amras Recipe: ताज्या आणि रसाळ आंब्यापासून झटपट बनवा आमरस, जाणून घ्या टेस्टी रेसिपी

Apr 27, 2024, 12:09 AM IST

    • Summer Special Recipe: उन्हाळ्यात आंब्यापासून विविध पदार्थ तयार केले जातात. तुम्ही घरी झटपट आमरस बनवू शकता. हा टेस्टी आमरस तुम्ही पुरी किंवा पराठ्यासोबत खाऊ शकता. जाणून घ्या आमरसची रेसिपी
Amras Recipe: ताज्या आणि रसाळ आंब्यापासून झटपट बनवा आमरस, जाणून घ्या टेस्टी रेसिपी (freepik)

Summer Special Recipe: उन्हाळ्यात आंब्यापासून विविध पदार्थ तयार केले जातात. तुम्ही घरी झटपट आमरस बनवू शकता. हा टेस्टी आमरस तुम्ही पुरी किंवा पराठ्यासोबत खाऊ शकता. जाणून घ्या आमरसची रेसिपी

    • Summer Special Recipe: उन्हाळ्यात आंब्यापासून विविध पदार्थ तयार केले जातात. तुम्ही घरी झटपट आमरस बनवू शकता. हा टेस्टी आमरस तुम्ही पुरी किंवा पराठ्यासोबत खाऊ शकता. जाणून घ्या आमरसची रेसिपी

Aamras Recipe: आंबा हे उन्हाळी फळ आहे जे बहुतेकांना आवडते. लोक हे फक्त फळ म्हणून खातात असे नाही तर यापासून अनेक प्रकारचे पदार्थ देखील बनवतात. अनेक जण बाजारात आंबा आल्यापासून सीझन संपेपर्यंत रोज आंबा खातात. ताज्या पिकलेल्या आंब्याच्या गरपासून मँगो लस्सी, आम्रखंड बनवण्यासोबतच तु्म्ही आंब्याचा रस देखील बनवू शकता. हे तुम्ही जेवणासोबत किंवा डेझर्ट म्हणून खाऊ शकता. बऱ्याच लोकांना आमरस पुरीसोबत खायला आवडते. तुम्ही ते पुरी किंवा पराठ्यासोबतही सर्व्ह करू शकता. आमरस बनवणे सोपे असून ते झटपट तयार होते. चला तर मग जाणून घ्या आमरसची रेसिपी.

ट्रेंडिंग न्यूज

World Hypertension Day 2024: का साजरा केला जातो वर्ल्ड हायपरटेन्शन डे? जाणून घ्या इतिहास आणि यावर्षीची थीम

Ovarian Cancer: वेळेवर तपासणी केल्याने ओव्हेरियन कॅन्सरवर मात करणे शक्य, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Kadhi Recipe: उडीद आणि बेसन घालून बनवा छत्तीसगडची प्रसिद्ध कढी, झटपट तयार होते ही रेसिपी

Thick Eyelashes: पापण्या दाट आणि लांब करण्यासाठी करा हे उपाय, वाढेल डोळ्यांचे सौंदर्य

आमरस बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे -

- २०० ग्रॅम आंबे

- अर्धा चमचा वेलची पावडर

- दोन चिमूटभर केशराचे धागे

- १ ते दीड चमचा साखर किंवा गूळ

- अर्धा चमचा सुंठ पावडर

- आवश्यकतेनुसार पाणी किंवा दूध.

आमरस बनवण्याची पद्धत

आमरस बनवण्यासाठी आधी आंबे स्वच्छ पाण्याने चांगले धुवा. नंतर स्वच्छ किचन टॉवेलने नीट पुसून वाळवा. आता आंब्याचे साल काढून घ्या आणि आंब्याचे तुकडे करा. आता कापलेले आंबे ब्लेंडरमध्ये टाका. जर आंबा थोडा आंबट असेल तर त्यात थोडी साखर किंवा तुमच्या आवडीचे कोणतेही गोड पदार्थ घाला. तु्म्हाला हवे असेल तर तुम्ही थोडेसे गुळही वापरू शकता. आता त्याचा मऊ गर होईपर्यंत ब्लेंड करा. आता हा आंब्याचा पल्प एका बाउलमध्ये काढा. आता त्यात वेलची पावडर आणि कुस्करलेले केशरचे धागे टाका. चांगले मिक्स करा आणि थोडे पातळ करण्यासाठी दूध किंवा पाणी घाला. 

आता ते एका भांड्यात किंवा कंटेनरमध्ये ठेवा. हे भांडे किंवा कंटेनर झाकून ३० मिनिटे ते एक तासासाठी फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. तुमचे टेस्टी आमरस सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. तुम्ही हे पुरी किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करू शकता. किंवा हे नुसते देखील खाऊ शकता.

विभाग

पुढील बातम्या