Coconut Shikanji Recipe: कडक उन्हाळ्याच्या दिवसात थंडगार ड्रिंक्स प्यायला सर्वांनाच आवडते. लिंबू सरबतसोबत विविध प्रकारचे ज्यूस, ड्रिंक्स या दिवसात आवडीने घेतले जातात. तुम्हाला नेहमीचे सरबत, ज्यूस ऐवजी काहीतरी वेगळे आणि नवीन ट्राय करायचे असेल तर तुमही नारळाची शिकंजी बनवू शकता. हे टेस्टी ड्रिक तुमचे शरीर आणि मन फ्रेश करेल. हे जेवढे टेस्टी आहे तेवढेच बनवायला सोपे आहे. आणि झटपट तयार होते. चला तर मग या जाणून घ्या कसे बनवायची कोकोनट शिकंजी.
- १ ग्लास नारळ पाणी
- २ चमचे पिठी साखर
- १ चमचा आल्याचा रस
- २ लिंबू
- १ ग्लास सोडा वॉटर (साधेपाणी देखील वापरू शकता)
- चिमूटभर काळे मीठ
कोकोनट शिकंजी बनवण्यासाठी प्रथम एका ग्लासमध्ये नारळाचे पाणी काढून त्यात पिठी साखर टाकून मिक्स करुन घ्या. आता दुसऱ्या ग्लासमध्ये सोडा वॉटर आणि लिंबू टाका. तुम्हाला सोडा वॉटर नको असेल तर तुम्ही साधे पाणी सुद्धा वापरु शकता. आता हे नीट मिक्स करा. नंतर त्यात नारळाचे पाणी टाकून मिक्स करा. आता हे २ ते ३ तास थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा. तुमची कोकोनट शिकंजी तयार आहे. सर्व्ह करण्यापूर्वी त्यावर काळे मीठ आणि पुदिन्याच्या पानांनी गार्निश करा.