मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Adulterated Ghee: तुम्ही भेसळयुक्त तूप तर खात नाहीये ना? 'अशी' तपास शुद्धता!

Adulterated Ghee: तुम्ही भेसळयुक्त तूप तर खात नाहीये ना? 'अशी' तपास शुद्धता!

Apr 26, 2024, 03:27 PM IST

    • Rancid ghee: बाजारात भेसळयुक्त गाईचे तूप बिनदिक्कत विकले जात आहे. याचमुळे भेसळयुक्त तूप खात आहात की नाही हे जाणून घेणे गरजेचे आहे.
how to find out your ghee is Adulterated are not (freepik)

Rancid ghee: बाजारात भेसळयुक्त गाईचे तूप बिनदिक्कत विकले जात आहे. याचमुळे भेसळयुक्त तूप खात आहात की नाही हे जाणून घेणे गरजेचे आहे.

    • Rancid ghee: बाजारात भेसळयुक्त गाईचे तूप बिनदिक्कत विकले जात आहे. याचमुळे भेसळयुक्त तूप खात आहात की नाही हे जाणून घेणे गरजेचे आहे.

Kitchen Tips: भारतात आवर्जून तूप खाल्ले जाते. आयुर्वेदानुसार याचे अनेक फायदे आहेत. भारतातील सर्वात जास्त विकले जाणारे दुग्धजन्य पदार्थ म्हणजे तूप, जे गायीच्या दुधापासून बनवले जाते. वनस्पती तेले अस्तित्वात येण्यापूर्वी अन्न मुख्यतः तुपात शिजवले जात असे. तथापि, कालांतराने, तुपाचे महत्त्व कमी झाले आणि आता ते विशेष प्रसंगी स्वयंपाकात वापरले जाते. ९९.५ टक्के फॅटने (ज्यापैकी ६२ टक्के सॅच्युरेटेड फॅट) बनलेले आहे, तूप अनेक आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी देखील वापरले जाते. आजच्या काळात प्रत्येक गोष्टीत भेसळ होत आहे. यात चांगल्या प्रतीचे तूप शोधणे हे मोठे काम होऊ शकते. कारण भेसळयुक्त गाईचे तूप बाजारात बिनधास्तपणे विकले जात आहे. शिळे तुपाचा रंग सारखाच असल्याने ते तूप म्हणून विकले जाते. अशा परिस्थितीत आज आम्ही अशाच काही आयडिया सांगत आहोत ज्याद्वारे भेसळयुक्त तूप सहज शोधता येते.

ट्रेंडिंग न्यूज

Fitness Mantra: तुमचे वजन जास्त असेल तर करा हे पायांचे व्यायाम, सोपे होईल वेट लॉस

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

पहिली आयडिया

तुपात खोबरेल तेल असू शकते. तुपात खोबरेल तेल आहे की नाही हे तपासण्यासाठी डबल-बॉयलर पद्धतीने तूप काचेच्या भांड्यात वितळवा. ही बरणी काही वेळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. जर तूप आणि खोबरेल तेल वेगवेगळ्या थरांमध्ये घट्ट झाले तर तूप भेसळ आहे.

Sprouts Breakfast: नाश्त्यात शेंगदाणे, हरभरा आणि मूग डाळपासून बनवा चविष्ट डिश, जाणून घ्या रेसिपी!

दुसरी आयडिया

सर्वात सोपा उपाय म्हणजे एका भांड्यात एक चमचा तूप गरम करणे. जर तूप लगेच वितळले आणि गडद तपकिरी रंगाचे झाले तर ते शुद्ध दर्जाचे आहे. तथापि, जर ते वितळण्यास वेळ लागला आणि त्याचा रंग हलका पिवळा झाला, तर ते टाळणे चांगले.

National Civil Service Day 2024: राष्ट्रीय नागरी सेवा दिवस का साजरा करतात? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व!

तिसरी आयडिया

तुमच्या तळहातात एक चमचा तूप घ्या. हे तूप स्वतःहून वितळले तर ते शुद्ध आहे.

Cardamom Benefits: श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासोबतच तुमचा चेहरा देखील चमकेल, जाणून घ्या वेलचीचे फायदे!

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

पुढील बातम्या