मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Dry Skin in Winter: थंडीमुळे कोरडी त्वचा खाजवतेय? जाणून घ्या कसे लावावे मॉइश्चरायझर

Dry Skin in Winter: थंडीमुळे कोरडी त्वचा खाजवतेय? जाणून घ्या कसे लावावे मॉइश्चरायझर

Jan 25, 2024, 07:05 PM IST

    • Itchy Dry Skin: थंडीमुळे त्वचा कोरडी होते. कधी कधी त्वचा अधिक कोरडी झाल्याने खाज येते. तुम्हाला सुद्धा असा त्रास असेल तर योग्य मॉइश्चरायझर निवडण्याची आणि लावण्याची पद्धत जाणून घ्या.
कोरडी त्वचेसाठी मॉइश्चरायझर वापरण्याची योग्य पद्धत (unsplash)

Itchy Dry Skin: थंडीमुळे त्वचा कोरडी होते. कधी कधी त्वचा अधिक कोरडी झाल्याने खाज येते. तुम्हाला सुद्धा असा त्रास असेल तर योग्य मॉइश्चरायझर निवडण्याची आणि लावण्याची पद्धत जाणून घ्या.

    • Itchy Dry Skin: थंडीमुळे त्वचा कोरडी होते. कधी कधी त्वचा अधिक कोरडी झाल्याने खाज येते. तुम्हाला सुद्धा असा त्रास असेल तर योग्य मॉइश्चरायझर निवडण्याची आणि लावण्याची पद्धत जाणून घ्या.

Moisturizer to Prevent Itchy Dry Skin in Winter: कडाक्याच्या थंडीमुळे त्वचा जास्त कोरडी होते. याची अनेक कारणे आहेत. थंड वाऱ्यामध्ये ओलावा नसतो. त्यामुळे त्वचा कोरडी होते. याशिवाय या काळात गरम पाण्याने आंघोळ करणे, शरीर गरम ठेवण्यासाठी हीटर किंवा फायर वापरणे हे सुद्धा त्वचा कोरडी होण्याचे कारण असू शकते. या सर्व गोष्टी मिळून त्वचा पूर्णपणे कोरडी आणि निर्जीव बनते. परिणामी त्वचेला अनेक वेळा खाज सुटू लागते. अशा परिस्थितीत त्वचा योग्यरित्या हायड्रेटेड असणे आणि नंतर मॉइश्चरायझर लावणे महत्वाचे आहे. योग्य मॉइश्चरायझर कसे निवडावे आणि ते लावण्याची योग्य पद्धत कोणती हे आधी जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

joke of the day : मूडमध्ये असलेल्या नवऱ्यानं बनवलेल्या जेवणाला बायकोनं कशी दाद दिली पाहाच!

National Endangered Species Day 2024: राष्ट्रीय लुप्तप्राय प्रजाती दिन साजरा करण्याचा इतिहास काय आहे? जाणून घ्या या दिवस

World Hypertension Day 2024: का साजरा केला जातो वर्ल्ड हायपरटेन्शन डे? जाणून घ्या इतिहास आणि यावर्षीची थीम

Ovarian Cancer: वेळेवर तपासणी केल्याने ओव्हेरियन कॅन्सरवर मात करणे शक्य, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

पुन्हा पुन्हा लावावे लागेल मॉइश्चरायझर

त्वचा खूप कोरडी राहिल्यावर काही काळानंतर मॉइश्चरायझरचा प्रभाव कमी होऊ लागतो. अशा स्थितीत दर ४-५ तासांनी मॉइश्चरायझर लावा. यामुळे त्वचेला मॉइश्चरायझेशन राहील.

पेट्रोलियम जेली आधारित मॉइश्चरायझर

जेव्हा त्वचा पूर्णपणे कोरडी आणि निर्जीव बनते, तेव्हा व्हॅसलीन सारखे पेट्रोलियम जेली सामान्य मॉइश्चरायझरपेक्षा त्यावर अधिक जलद प्रभाव दर्शवते. त्यामुळे व्हॅसलीन लावा. ते त्वचेला मॉइश्चराइझ करेल.

बेबी ऑइल देखील करेल मदत

जर तुमच्या मॉइश्चरायझरचा त्वचेवर कोणताही परिणाम होत नसेल तर त्वचेवर बेबी ऑइल लावा. त्यात अधिक पोषण असते आणि ते त्वचेवर जास्त काळ टिकते. थंडीमध्ये नेहमी ऑइल बेस्ड मॉइश्चरायझर निवडा.

मॉइश्चरायझर लावण्याची योग्य पद्धत

हिवाळ्यात ओलावा नसतो. जेव्हा तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करता तेव्हा तुमच्या शरीरातील पाणी काही वेळाने सुकते. अशा परिस्थितीत जेव्हा मॉइश्चरायझर लावले जाते तेव्हा ते त्वचेला आतून मॉइश्चरायझ करत नाही ते फक्त त्वचेवर असलेले पाणी लॉक करते. जर शरीर पूर्णपणे कोरडे असेल तर मॉइश्चरायझरचा प्रभाव खूपच कमी होईल. म्हणून नेहमी त्वचा थोडी ओली असतानाच मॉइश्चरायझर लावा. यामुळे त्वचेवर असलेले पाणी लॉक होईल आणि त्वचा जास्त काळ ओलसर राहील. यामुळे कोरडेपणा आणि खाज सुटणार नाही.

 

घरगुती उपाय वापरत राहा

तुमच्या डेली रुटीनमध्ये मॉइश्चरायझर लावण्यासोबतच मध आणि दही यांसारखे नैसर्गिक मॉइश्चरायझर देखील वेळोवेळी वापरत राहा. जेणेकरून त्वचेला नैसर्गिकरीत्या ओलावा मिळेल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग

पुढील बातम्या