मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Facial Hair: सौंदर्य खराब करतात चेहऱ्यावरील छोटे-छोटे केस, दूर करण्यासाठी वापरा हा फेस पॅक

Facial Hair: सौंदर्य खराब करतात चेहऱ्यावरील छोटे-छोटे केस, दूर करण्यासाठी वापरा हा फेस पॅक

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 22, 2024 11:40 AM IST

Homemade Face Pack: चेहऱ्यावर वाढणारे छोटे केस महिलांचे सौंदर्य बिघडवतात. तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा असे केस असतील आणि तुम्हाला वॅक्सिंग आणि थ्रेडिंग करायचं नसेल तर हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा.

फेशियल हेअर काढण्यासाठी फेस पॅक
फेशियल हेअर काढण्यासाठी फेस पॅक (unsplash)

Face Pack to Remove Unwanted Facial Hair: महिलांच्या चेहऱ्यावर अनेकदा लहान केस वाढतात. हे खूप वाईट दिसते आणि महिलांना ते अजिबात आवडत नाही. या छोट्या छोट्या फेशियल केसांनी महिलांचे सौंदर्य बिघडते. अशा स्थितीत वॅक्सिंग, थ्रेडिंग किंवा रेझरने ते काढण्याऐवजी एकदा घरगुती फेसपॅक वापरून पहा. हे केस सहज काढतात. तसेच, वॅक्सिंगसारख्या वेदना होत नाहीत. चला तर मग जाणून घेऊया चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्यासाठी घरी फेस पॅक कसा बनवायचा.

नको असलेले फेशियल हेअर काढण्यासाठी फेस पॅक

चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी घरगुती फेस पॅक त्वचेला हानी पोहोचवत नाही आणि केस हळूहळू काढण्यास मदत करतो. फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला या गोष्टी लागतील.

- एक छोटा कप दूध

- अर्धा चमचा हळद

- एक चमचा साखर

- एक चमचा बेसन

- एक चमचा लिंबाचा रस

सर्वप्रथम एका भांड्यात दूध उकळवा. उकळताना त्यात साखर घाला. तसेच हळद घाला. हे दूध थोडा वेळ शिजवून घट्ट करा. नंतर गॅस बंद करून भांडे खाली घ्या आणि थोडं थंड होऊ द्या. आता त्यात एक चमचा बेसन आणि लिंबाचा रस घाला. चांगले मिक्स करा. तुमचा फेस पॅक तयार आहे.

फेशियल हेअर रिमूव्हल फेस पॅक लावण्याची पद्धत

हा फेस पॅक लावण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. त्यानंतर चेहऱ्यावर फेस पॅक लावा आणि नीट कोरडा होऊ द्या. पॅक पूर्ण सुकल्यावर कापड ओले करून पूर्णपणे पिळून घ्या. जेणेकरून सर्व पाणी बाहेर निघेल. कपड्यात फक्त थोडासा ओलावा राहील याची काळजी घ्या. आता या कापडाने फेस पॅक चेहऱ्याच्या केसांच्या भागावर वरच्या बाजूस चोळून काढा. हा फेस पॅक केस हळूहळू काढण्यास मदत करेल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel