Homemade Serum to Remove Dirt and Tanning: हिवाळ्यात त्वचेची चमक अनेकदा गायब होते. हे नैसर्गिक तेलाच्या कमतरतेमुळे होते. तसेच जेव्हा या कोरड्या त्वचेवर धूळ आणि माती जमा होऊ लागते तेव्हा काळेपणा दिसून येतो. अशा स्थितीत चेहरा खराब तर दिसतोच पण निस्तेजही दिसतो. या कोरड्या त्वचेवर स्क्रब लावल्यास वेदना होतात आणि त्वचेला इजा होण्याचीही भीती असते. चेहऱ्यावरील काळेपणा दूर करण्यासाठी कच्च्या बटाट्याचा रस या गोष्टींमध्ये मिसळून सीरम तयार करा. याने तुमच्या चेहऱ्याचा काळेपणा दूर होऊन फायदा होईल. जाणून घ्या हे घरी कसे बनवावे आणि वापरावे.
चेहऱ्याच्या त्वचेवर चमक आणण्यासाठी घरगुती उपाय खूप प्रभावी असतात. जर तुम्हाला तुमच्या त्वचेवर निस्तेजपणा आणि काळेपणा दिसत असेल तर ते दूर करण्यासाठी या तीन घटकांसोबत होममेड सीरम बनवा. हे बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे -
- एक चमचा कच्च्या बटाट्याचा रस
- एक चमचा मध
- एक चमचा दही
या तीन गोष्टी एकत्र करून बॉटलमध्ये भरून ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण चेहऱ्यावर सीरमप्रमाणे लावा आणि झोपा. सकाळी उठल्यानंतर चेहरा पाण्याने धुवा. काही दिवसातच चेहऱ्यावर ग्लो दिसू लागेल आणि त्वचेत फरक दिसेल.
जेव्हाही सीरमसाठी कच्च्या बटाट्याचा रस घ्याल तेव्हा तो किसून घ्या आणि कापडाने पिळून घ्या. हे काचेच्या भांड्यात ठेवा. नंतर या रसाच्या वरचा पांढरा भाग घ्या. खालील पिष्टमय किंवा स्टार्चचा भाग घेऊ नका. कच्च्या बटाट्याचा रस चेहऱ्यावर लावण्यासाठी फक्त पांढरा भाग फायदेशीर ठरतो.
त्वचेला नैसर्गिकरीत्या मॉइश्चराइझ करण्यासाठी मध उपयुक्त ठरेल. तर दही आणि कच्च्या बटाट्याचा रस त्वचेचा रंग सुधारण्यास मदत करेल. तसेच काळे डाग दूर होतील. हे घरगुती सीरम कमी प्रमाणात बनवा आणि एक ते दोन दिवस वापरा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)