मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Holi Recipe: होळीच्या दिवशी घरी बनवा कुरकुरे, मार्केटसारखी टेस्ट देईल ही रेसिपी

Holi Recipe: होळीच्या दिवशी घरी बनवा कुरकुरे, मार्केटसारखी टेस्ट देईल ही रेसिपी

Mar 24, 2024, 02:21 PM IST

    • Holi 2024: होळीला तुम्ही कितीही स्नॅक्स तयार केलेत तरी मुले अनेकदा फक्त पॅकेट चिप्स आणि कुरकुरे खाण्याची मागणी करतात. अशा वेळी तुम्ही घरीच कुरकुरे बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी
कुरकुरे (freepik)

Holi 2024: होळीला तुम्ही कितीही स्नॅक्स तयार केलेत तरी मुले अनेकदा फक्त पॅकेट चिप्स आणि कुरकुरे खाण्याची मागणी करतात. अशा वेळी तुम्ही घरीच कुरकुरे बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी

    • Holi 2024: होळीला तुम्ही कितीही स्नॅक्स तयार केलेत तरी मुले अनेकदा फक्त पॅकेट चिप्स आणि कुरकुरे खाण्याची मागणी करतात. अशा वेळी तुम्ही घरीच कुरकुरे बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी

Kurkure Recipe: होळीच्या दिवशी प्रत्येक घरात मठरी, शेव असे विविध नमकीनचे पदार्थ बनवले जातात. मात्र भरपूर पदार्थ असूनही मुले पॅकेट चिप्स आणि कुरकुरे खाण्याची मागणी करतात. अशा परिस्थितीत तुम्हाला हवे असेल तर तुम्ही घरच्या घरी मुलांसाठी टेस्टी आणि क्रिस्पी कुरकुरे बनवू शकता. हे बनवायला खूप सोपे आहे आणि काही वेळात तयार होईल. ही सोपी रेसिपी फॉलो करून तुम्ही घरच्या घरी मार्केटसारखे कुरकुरे बनवू शकता.

ट्रेंडिंग न्यूज

Vitamin B12 Deficiency: व्हिटॅमिन बी१२ च्या कमतरतेमुळे होऊ शकते पाठदुखी, जाणून घ्या कसे करावे उपचार

Litchi Shake: उन्हाळ्यात काही खास प्यावेसे वाटत असेल तर बनवा लिची शेक, खूप सोपी आहे रेसिपी

Sandalwood Face Pack: उन्हाळ्यात घामोळ्या आणि पिंपल्सपासून आराम देईल चंदन, पाहा कसा बनवायचा फेस पॅक

Yoga Mantra: उन्हाळ्यात तुमचे शरीर थंड ठेवतील ही ३ योगासनं, जाणून घ्या फायदे आणि करण्याची योग्य पद्धत

कुरकुरे बनवण्यासाठी साहित्य

- ३-४ बटाटे

- एक वाटी तांदूळ

- एक चमचा पेरी पेरी मसाला

- मॅगी मसाला

- तिखट

- धनेपूड

- जिरेपूड

- चवीनुसार मीठ

कुरकुरे बनवण्याची पद्धत

घरी कुरकुरे बनवण्यासाठी प्रथम एक कप तांदूळ स्वच्छ धुवून भिजवा. नंतर तीन ते चार बटाटे उकळून घ्या. तासाभरात तांदूळ पूर्णपणे भिजतील. नंतर हे तांदूळ ग्राइंडरच्या भांड्यात टाकून त्याची पेस्ट बनवा. पेस्ट खूप पातळ नसावी याची खात्री करा. कमी पाणी घालून तांदूळ बारीक करा. नंतर उकडलेले बटाटे सोलून ग्राइंडरच्या जारमध्ये टाकून बारीक करा. द्रावण घट्ट राहिले पाहिजे. आता या बटाटे आणि तांदळाच्या मिश्रणात पेरी पेरी मसाला, मीठ, तिखट, मॅगी मसाला, भाजलेले जिरेपूड, भाजलेली धनेपूड घालून मिक्स करा. पॉलिथिनचा कोन बनवा किंवा बॉटलला लहान छिद्र करा. आता हे तयार द्रावण चांगले फेटून घ्या. जेणेकरून ते फुलेल. आता तेल गरम करा आणि बाटलीतून झिग-झॅग आकाराचे कुरकुरे स्क्वीज करून घ्या. सोनेरी तळून घ्या. आणि नंतर थंड करा. तुमचे कुरकुरे तयार आहे.

विभाग

पुढील बातम्या