मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Weight Loss: पोटाची चरबी कमी करण्यासाठी प्या 'हा' चहा!

Weight Loss: पोटाची चरबी कमी करण्यासाठी प्या 'हा' चहा!

Oct 06, 2022, 01:54 PM IST

    • Health Care: हा चहा फॅट, कॅन्सर आणि हृदयविकारांपासून बचाव करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.
चहामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात.

Health Care: हा चहा फॅट, कॅन्सर आणि हृदयविकारांपासून बचाव करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

    • Health Care: हा चहा फॅट, कॅन्सर आणि हृदयविकारांपासून बचाव करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

तुम्हाला चहा खूप आवडतो? जर उत्तर हो असेल तर नेहमीच्या चहाला ब्रेक देऊन तुम्ही वेट लॉस फ्रेंडली चहा प्यायला हवा. या चहा मुळे चहा पिण्याच्या सुखासोबत वजनही कमी करता येईल. तुम्ही नेहमीच्या साखरेच्या आणि दुधाच्या चहाऐवजी थोडा हेल्दी चहा प्यावा. या चहामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात. हा चहा फॅट, कॅन्सर आणि हृदयविकारांपासून बचाव करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. चला, जाणून घ्या हेल्दी चहाचे पर्याय...

ट्रेंडिंग न्यूज

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

पांढरा चहा

शरीरातील पेशी दुरुस्त करण्यासोबतच वृद्धत्व कमी करण्यासाठी पांढरा चहा खूप प्रभावी आहे. दिवसातून दोनदा पांढरा चहा प्यायला पाहिजे. रिकाम्या पोटी पांढरा चहा सर्वात फायदेशीर आहे.

ओलॉन्ग चहा

ओलॉन्ग चहा एक हर्बल चहा आहे ज्याचा वापर जलद वजन कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो. ते प्यायल्याने व्यक्तीच्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. हे प्यायल्याने पोट बराच काळ भरलेले राहते.

काळा चहा

दररोज एक कप काळा चहा प्यायल्याने तुमचे हृदय मजबूत होते आणि रक्त प्रवाह सुधारतो. रोज एक कप काळा चहा प्यायला पाहिजे पण रिकाम्या पोटी काळा चहा पिऊ नये.

देशी काढा

जर तुम्हाला काही कारणास्तव हे चहा विकत घ्यायचे नसतील तर तुम्ही देशी काढा बनवूनही पिऊ शकता. यासाठी तुळशीची पाने, लवंग, आले, दालचिनी आणि गुळाचा तुकडा पाण्यात उकळून घ्यावा. हा चहा सकाळी आणि संध्याकाळी प्या. ते प्यायल्याने चरबी निघून जाते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग

पुढील बातम्या