मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hanuman Jayanti Recipe: हनुमान जयंतीला प्रसादासाठी घरीच बनवा बुंदी, मिळेल पवनपुत्राचा आशीर्वाद

Hanuman Jayanti Recipe: हनुमान जयंतीला प्रसादासाठी घरीच बनवा बुंदी, मिळेल पवनपुत्राचा आशीर्वाद

Apr 22, 2024, 01:08 PM IST

    • Hanuman Jayanti Prasad Recipe: बजरंग बलीला बुंदीचा प्रसाद खूप प्रिय आहे. तुम्हाला जर प्रसादासाठी बुंदी घरी बनवायची असेल तर ही रेसिपी फॉलो करा.
Hanuman Jayanti Recipe: हनुमान जयंतीला प्रसादासाठी घरीच बनवा बुंदी, मिळेल पवनपुत्राचा आशीर्वाद

Hanuman Jayanti Prasad Recipe: बजरंग बलीला बुंदीचा प्रसाद खूप प्रिय आहे. तुम्हाला जर प्रसादासाठी बुंदी घरी बनवायची असेल तर ही रेसिपी फॉलो करा.

    • Hanuman Jayanti Prasad Recipe: बजरंग बलीला बुंदीचा प्रसाद खूप प्रिय आहे. तुम्हाला जर प्रसादासाठी बुंदी घरी बनवायची असेल तर ही रेसिपी फॉलो करा.

Hanuman Jayanti Special Boondi Recipe: हिंदू पंचांगनुसार २३ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेला देशभरात हनुमान जयंती उत्सव साजरा केला जाईल. हनुमान जयंती हा रामभक्त हनुमानजींचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. हनुमान जयंतीला पवनपुत्राचे भक्त त्यांना प्रसन्न करण्यासाठी केशरी सिंदूर आणि गोड बुंदी अर्पण करतात. असे मानले जाते की बजरंग बलीला गोड बुंदीचा प्रसाद खूप आवडते. यावेळी जर तुम्हाला बजरंग बलीला बाजारातून आणलेली बुंदीचा प्रसाद नैवेद्यात अर्पण करायचा नसेल तर तुम्ही घरी सुद्धा बुंदी बनवू शकता. विशेष म्हणजे घरी बुंदी बनवणे खूप सोपे आहे आणि झटपट तयार होते. चला तर मग हनुमान जयंतीला प्रसादासाठी बुंदी कशी बनवायची ते जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

World Telecommunication Day 2024: जागतिक दूरसंचार दिवस साजरा करण्याचा उद्देश काय? काय आहे यावर्षीची थीम?

joke of the day : मूडमध्ये असलेल्या नवऱ्यानं बनवलेल्या जेवणाला बायकोनं कशी दाद दिली पाहाच!

National Endangered Species Day 2024: राष्ट्रीय लुप्तप्राय प्रजाती दिन साजरा करण्याचा इतिहास काय आहे? जाणून घ्या या दिवस

World Hypertension Day 2024: का साजरा केला जातो वर्ल्ड हायपरटेन्शन डे? जाणून घ्या इतिहास आणि यावर्षीची थीम

बुंदी बनवण्यासाठी ही रेसिपी फॉलो करा

बूंदी तयार करण्यासाठी साहित्य

- बेसन - १ कप

- केशरी फूड कलर - १/४ टीस्पून

- बेकिंग सोडा - १/४ टीस्पून

- पाणी आवश्यकतेनुसार

- देशी तूप बुंदी तळण्यासाठी

पाक तयार करण्यासाठी साहित्य

- साखर - १.५ कप

- केशरी फूड कलर - १/४ टीस्पून

- वेलची - २

- पाणी - सव्वा कप

बुंदी बनवण्याची पद्धत

हनुमान जयंतीला बुंदीचा प्रसाद तयार करण्यासाठी प्रथम साखरेचा पाक तयार करा. यासाठी एका कढईत १ वाटी साखर, वेलची आणि दीड कप पाणी टाकून गॅसवर मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा. साखर पूर्णपणे वितळेपर्यंत चमच्याने पाणी ढवळत राहा. यानंतर पाक ५ मिनिटे उकळवा. आता त्यात फूड कलर घाला. नंतर गॅस बंद करा आणि बाजूला ठेवा. यानंतर बुंदी बनवण्यासाठी एका मोठ्या भांड्यात बेसन आणि फूड कलर घालून मिक्स करा. यानंतर बेसनमध्ये तीन-चतुर्थांश कप पाणी घालून हळूहळू मिक्स करा. आता पिठात बेकिंग सोडा टाका आणि ५ मिनिटे चांगले फेटून द्रावण गुळगुळीत करा. आता कढईत देशी तूप घालून गरम करा. आता मोठ्या गाळणीच्या साहाय्याने बेसनाच्या पिठातून बुंदी बनवून कढईत घाला. बुंदी कढईत टाकल्यानंतर त्याचा रंग सोनेरी तपकिरी होऊन कुरकुरीत होईपर्यंत तळा. 

यानंतर कढईतून बुंदी काढा. नंतर लगेच साखरेच्या पाकात घाला आणि किमान १ तास ठेवा. असे केल्याने बुंदी पाक चांगले शोषून घेते. तुमची बुंदीचा प्रसाद बजरंग बलीला अर्पण करण्यासाठी तयार आहे.

पुढील बातम्या