मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Coffee Making Tips: कॉफी बनवताना फॉलो करा 'या' ट्रिक्स, स्वाद होईल डबल

Coffee Making Tips: कॉफी बनवताना फॉलो करा 'या' ट्रिक्स, स्वाद होईल डबल

Jan 09, 2023, 09:19 AM IST

    • Coffee Making Method: कॉफीचे नाव अनेकांच्या आवडत्या पेयांमध्ये समाविष्ट आहे. रेस्टॉरंट सारखी चविष्ट कॉफी घरी बनवणे बहुतेक लोकांसाठी एक आव्हानात्मक काम आहे. तुम्हाला हवे असल्यास, काही स्मार्ट टिप्सच्या मदतीने तुम्ही स्वादिष्ट कॉफी बनवू शकता.
कॉफी मेकिंग रेसिपी (Freepik )

Coffee Making Method: कॉफीचे नाव अनेकांच्या आवडत्या पेयांमध्ये समाविष्ट आहे. रेस्टॉरंट सारखी चविष्ट कॉफी घरी बनवणे बहुतेक लोकांसाठी एक आव्हानात्मक काम आहे. तुम्हाला हवे असल्यास, काही स्मार्ट टिप्सच्या मदतीने तुम्ही स्वादिष्ट कॉफी बनवू शकता.

    • Coffee Making Method: कॉफीचे नाव अनेकांच्या आवडत्या पेयांमध्ये समाविष्ट आहे. रेस्टॉरंट सारखी चविष्ट कॉफी घरी बनवणे बहुतेक लोकांसाठी एक आव्हानात्मक काम आहे. तुम्हाला हवे असल्यास, काही स्मार्ट टिप्सच्या मदतीने तुम्ही स्वादिष्ट कॉफी बनवू शकता.

Recipe: चहा प्रमाणेच कॉफीचे सेवन अनेक घरांमध्ये सामान्य आहे. त्याच वेळी, कॉफी देखील काही लोकांची आवडती आहे. सकाळची सुरुवात करण्यासाठी, थकवा दूर करण्यासाठी आणि झोपेतून सुटका करण्यासाठी बहुतेक लोकांना कॉफी पिणे आवडते. चविष्ट कॉफी घरी बनवण्यासाठी (Coffee Making Tips) लोक अनेक पद्धतींचा अवलंब करतात. अनेक प्रयत्नांनंतरही घरी बनवलेल्या कॉफीची चव रेस्टॉरंटसारखी लागत नाही. म्हणूनच आम्ही तुम्हाला कॉफी बनवण्याच्या काही स्मार्ट टिप्स सांगणार आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही काही मिनिटांत हॉटेलसारखी चविष्ट आणि फेसाळ कॉफी बनवू शकता.

ट्रेंडिंग न्यूज

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

योग्य प्रमाणात कॉफी पावडर घाला

कॉफी पावडरची चव हलकीशी कडू असते. अशा परिस्थितीत चवदार कॉफी बनवण्यासाठी दूध आणि कॉफी पावडरचा योग्य प्रमाणात वापर करणे आवश्यक आहे. यासाठी १ कप दुधात २ चमचे कॉफी पावडर मिसळणे चांगले. यामुळे तुमच्या कॉफीची चव खराब होत नाही.

तापवलेलं दूध वापरा

काही लोक कॉफीमध्ये फ्रॉथ बनवण्यासाठी कच्चे दूध वापरतात. पण कच्चे दूध घातल्याने कॉफी पातळ होते. तसेच कॉफीमधून वास येऊ लागतो. म्हणूनच कॉफी बनवताना तापवलेलं दूध वापरणे केव्हाही चांगले.

कॉफीला फेटा

कॉफीमध्ये दूध घालण्यापूर्वी ते हलकेच फेटा. यामुळे कॉफीची चव तर दुप्पट होईलच, शिवाय कॉफीमध्ये फ्रॉथही तयार होईल आणि तुमची कॉफी एखाद्या रेस्टॉरंटसारखी दिसेल.

कोल्ड कॉफी बनवण्याच्या टिप्स

कोल्ड कॉफी बनवताना काही लोक थेट कॉफी पावडर आणि दूध यांचे मिश्रण करतात. त्यामुळे कॉफीची टेस्ट खराब होऊ लागते. अशावेळी गरम पाण्यात कॉफी पावडर घालून विरघळवून घ्या. यानंतर दुधात कॉफी मिक्स करून ब्लेंड करा. यामुळे तुमची कोल्ड कॉफी खूप चवदार होईल.

दूध उकळल्यावर कॉफी घाला

गरम कॉफी बनवताना काही लोक भांड्यात सर्व गोष्टी एकत्र उकळतात. त्यामुळे कॉफीची चव खराब होते. अशावेळी दूध गरम करायला ठेवा. आता उकळल्यानंतर त्यात कॉफी मिक्स करा. यामुळे कॉफी खूप चवदार होईल.

जास्त पाणी टाकू नका

कॉफी बनवताना पाणी घालू नये, पण जर पाणी घालायचेच असेल तर जास्त प्रमाणात पाणी वापरू नका. या प्रकरणात, २ कप कॉफी बनवण्यासाठी १/४ कप पाणी घाला. यामुळे कॉफीची चव खराब होणार नाही आणि कॉफी घट्टही होईल.

विभाग

पुढील बातम्या