मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Coffee Recipe: कॅरॅमल ते हळद... हिवाळ्यात बनवा या कॉफी, सगळेच करतील कौतुक!

Coffee Recipe: कॅरॅमल ते हळद... हिवाळ्यात बनवा या कॉफी, सगळेच करतील कौतुक!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Dec 23, 2022 09:22 AM IST

Winter Drink: कॉफी बनवण्याच्या या रेसिपी जाणून घेऊया.

कॉफी रेसिपी
कॉफी रेसिपी (Freepik )

हिवाळ्यातील सुंदर थंड वातावरणात गरमागरम चहा आणि कॉफीचा आस्वाद आवर्जून घेतला जातो. विशेषत: घरात पाहुणे आले की गप्पांसोबत कॉफी असतेच. रेस्टॉरंटमध्ये कॉफीचे अनेक प्रकार मिळता. पण त्याच पद्धतीने घरीही कॉफी बनवता येत नाही असं अनेकांना वाटतं. तुम्हालाही असाच वाटत असेल तर ही रेसिपी नक्की वाचा. तुम्ही घरी वेगवेगळ्या पद्धतीची कॉफी बनवू शकता. या तीन पद्धतीने बनवलेली कॉफी पिऊन सगळेच तुमचं कौतुक करतील. कॉफी बनवण्याच्या तीन रेसिपी जाणून घेऊया.

ट्रेंडिंग न्यूज

चोको मोचा कॉफी

एस्प्रेसो शॉट तीस ते चाळीस मिली, डार्क चॉकलेट दोन ते तीन तुकडे, ताजे दुधाची क्रीम, गार्निशसाठी कोको पावडर हे साहित्य गरजेचं आहे. एका कपमध्ये डार्क चॉकलेटचे दोन ते तीन तुकडे घ्या. गरम दुधात चांगले मेल्ट करा. चॉकलेट मेल्ट झाल्यानंतर कॉफी घाला आणि मिक्स करा. फ्रेश क्रीम घाला. शेवटी कोको पावडर घालून सर्व्ह करा.

हळद कॉफी

यासाठी तुम्हाला एस्प्रेसो शॉट तीस ते चाळीस मिली, ताजे मलई दूध एक कप, मध एक चमचा, हळद पावडर अर्धा चमचा, दालचिनी पावडर, बारीक चिरलेला पिस्ता सजवण्यासाठी आवश्यक आहे. एका कपमध्ये अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर दालचिनी पावडर घाला. त्यासोबत गरम फ्रॉस्टेड दूध टाका आणि कॉफी पावडर घालून मिक्स करा. मध एकत्र मिसळा. वरून बारीक पिस्ते टाका आणि गरमागरम सर्व्ह करा.

कॅरॅमल कॉफी

कॅरॅमल कॉफी बनवण्यासाठी, घरी कॅरॅमल सिरप तयार करा. कॅरॅमल सिरप तयार करण्यासाठी, बटरमध्ये साखर मेल्ट करा. ते मेल्ट झाल्यावर त्याची पेस्ट झाल्यावर गॅस बंद करा. आता कपमध्ये कॉफी पावडर आणि ताजे फ्रॉस्टेड दूध घाला. वर कॅरॅमल सिरप घाला आणि चांगले मिसळा. गरमागरम कॅरॅमल कॉफी तयार आहे. ते पाहुण्यांना सर्व्ह करा.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग