मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Eid al-Fitr Recipe: ईदला घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा मटण कटलेट, खूप सोपी आहे रेसिपी

Eid al-Fitr Recipe: ईदला घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा मटण कटलेट, खूप सोपी आहे रेसिपी

Apr 09, 2024, 11:38 PM IST

    • Eid Special Recipe: ज्या लोकांना नॉनव्हेज आवडते त्यांना मटन कटलेट्सची ही रेसिपी खूप आवडते. जाणून घ्या कसे बनवायचे मटण कटलेट.
Eid al-Fitr Recipe: ईदला घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा मटण कटलेट, खूप सोपी आहे रेसिपी (freepik)

Eid Special Recipe: ज्या लोकांना नॉनव्हेज आवडते त्यांना मटन कटलेट्सची ही रेसिपी खूप आवडते. जाणून घ्या कसे बनवायचे मटण कटलेट.

    • Eid Special Recipe: ज्या लोकांना नॉनव्हेज आवडते त्यांना मटन कटलेट्सची ही रेसिपी खूप आवडते. जाणून घ्या कसे बनवायचे मटण कटलेट.

Mutton Cutlet Recipe: रमजानची इफ्तार पार्टी असो किंवा ईदचा आनंद, जर तुम्हाला खास नॉनव्हेज डिश बनवायची असेल आणि घरी येणाऱ्या पाहुण्यांना खायला द्यायचे असेल तर मटण कटलेट्सची ही चविष्ट रेसिपी नक्की ट्राय करून पाहा. जे लोक नॉनव्हेजचे शौकीन आहेत त्यांना मटण कटलेटची ही रेसिपी खूप आवडते. या रेसिपीचे वैशिष्ट्य म्हणजे ही बनवायला खूप सोपी आहे. याशिवाय त्याची चव लहान मुलांसह मोठ्यांनाही खूप आवडते. चला तर मग जाणून घ्या घरच्या घरी चविष्ट मटण कटलेट कसे बनवायचे

ट्रेंडिंग न्यूज

Vitamin B12 Deficiency: व्हिटॅमिन बी१२ च्या कमतरतेमुळे होऊ शकते पाठदुखी, जाणून घ्या कसे करावे उपचार

Sandalwood Face Pack: उन्हाळ्यात घामोळ्या आणि पिंपल्सपासून आराम देईल चंदन, पाहा कसा बनवायचा फेस पॅक

Yoga Mantra: उन्हाळ्यात तुमचे शरीर थंड ठेवतील ही ३ योगासनं, जाणून घ्या फायदे आणि करण्याची योग्य पद्धत

Kedarnath Yatra: केदारनाथच्या आजूबाजूला आहेत ही सुंदर ठिकाणं, ती पाहिल्याशिवाय अपूर्ण राहील ट्रीप

मटण कटलेट बनवण्यासाठी साहित्य

- अर्धा किलो मटण कीमा

- २ उकडलेले बटाटे

- १ कांदा

- १ अंडे

- १ चमचा आले-लसूण पेस्ट

- २ चमचे कोथिंबीर

- १ कप ब्रेड क्रंब्स

- १ कप तेल

- २ चमचे कॉर्न फ्लोअर

- १ चमचा गरम मसाला

- १ चमचा चिली फ्लेक्स

- चवीनुसार मीठ

मटण कटलेट बनवण्याची पद्धत

मटण कटलेट बनवण्यासाठी प्रथम मटण कीमा धुवून कुकरमध्ये पाणी, आले, लसूण पेस्ट आणि मीठ घालून शिजवून घ्या. यानंतर त्यात उर्वरित सर्व साहित्य मिक्स करा. कीमा थंड झाल्यावर मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्या. आता मटणाच्या कीमाचे गोलआकाराचे कटलेट तयार करा. ब्रेडक्रंबमध्ये कोट करा आणि २० मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. आता कढईत तेल गरम करून आच कमी करा आणि कटलेट दोन्ही बाजूंनी तळून घ्या. 

तळलेले कटलेट पेपर टॉवेलवर काढा. जेणेकरून टॉवेल अतिरिक्त तेल शोषून घेईल. तुमचे मटण कटलेट सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. हे लाल आणि हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करू शकता.

पुढील बातम्या