Egg Pakora Recipe: रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. अशा परिस्थितीत उपवास करणारे सकाळी सेहरी आणि संध्याकाळी इफ्तारीसाठी अनेक प्रकारचे चविष्ट पदार्थ तयार करतात. जर तुम्ही घरी इफ्तार पार्टी आयोजित करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही ही टेस्टी स्ट्रीट फूड अंडी पकोडा रेसिपी ट्राय करू शकता. तुम्ही बटाटा, कांदा पकोडे अनेक वेळा खाल्ले असतील. पण हे अंड्याचे चटपटीत पकोडे खायला टेस्टी तर आहेतच पण ते बनवायलाही तितकेच सोपे आहेत. चला तर मग जाणून घ्या अंड्याचे पकोडे कसे बनवायचे.
- ३ अंडी
- १ कप बेसन
- २ हिरव्या मिरच्या चिरलेल्या
- ३/४ कांदा चिरलेला
- २ चमचे लसूण
- २ टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर
- १ टीस्पून बेकिंग सोडा
- १/४ टीस्पून काश्मिरी लाल तिखट
- चवीनुसार मीठ
- तळण्यासाठी तेल
अंड्याचे पकोडे बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात अंडी, हिरवी मिरची, कांदा, लसूण, कोथिंबीर, बेसन, चवीनुसार मीठ, बेकिंग सोडा आणि लाल तिखट घालून सर्व काही नीट मिक्स करून बाजूला ठेवा. आता कढईत तेल गरम करून पकोडे मध्यम आचेवर तळून घ्या. तेल गरम झाल्यावर अंडी पकोड्याचे मिश्रण गरम तेलात टाका आणि ३-४ मिनिटे शिजवा. नीट शिजण्यासाठी पकोडे सोनेरी होईपर्यंत परतत रहा. पकोडे तळून झाल्यावर कढईतून बाहेर काढा आणि गरमागरम सर्व्ह करा.
संबंधित बातम्या