मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Navratri Bhog Recipe: नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माँ चंद्रघंटाला अर्पण करा केसर पेडा, नोट करा रेसिपी

Navratri Bhog Recipe: नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माँ चंद्रघंटाला अर्पण करा केसर पेडा, नोट करा रेसिपी

Apr 11, 2024, 09:23 AM IST

    • Chaitra Navratri Bhog Recipe: जर तुम्हालाही माँ चंद्रघंटाचा आशीर्वाद हवा असेल तर आज प्रसाद म्हणून केसर पेडा बनवा. चला जाणून घेऊया केसर पेडा बनवण्याची रेसिपी.
Navratri Bhog Recipe: नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माँ चंद्रघंटाला अर्पण करा केसर पेडा, नोट करा रेसिपी (freepik)

Chaitra Navratri Bhog Recipe: जर तुम्हालाही माँ चंद्रघंटाचा आशीर्वाद हवा असेल तर आज प्रसाद म्हणून केसर पेडा बनवा. चला जाणून घेऊया केसर पेडा बनवण्याची रेसिपी.

    • Chaitra Navratri Bhog Recipe: जर तुम्हालाही माँ चंद्रघंटाचा आशीर्वाद हवा असेल तर आज प्रसाद म्हणून केसर पेडा बनवा. चला जाणून घेऊया केसर पेडा बनवण्याची रेसिपी.

Kesar Peda Recipe: चैत्र नवरात्रीचा पवित्र काळ सुरू आहे. अशा स्थितीत नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी दुर्गादेवीचे भक्त तिच्या चंद्रघंटा रूपाची पूजा करतात. असे मानले जाते की माँ दुर्गेचे हे रूप अत्यंत शांत आणि कल्याण करणारे आहे. जर माँ चंद्रघंटाच्या आवडत्या अन्नाबद्दल बोलायचे झाले तर माँ चंद्रघंटाला दूध आणि दुधापासून बनवलेल्या पदार्थांची खूप आवड आहे. यामुळेच देवीचे भक्त तिच्या या रूपाची उपासना करताना, माँ चंद्रघंटाला प्रसन्न करण्यासाठी दुधापासून बनवलेल्या वस्तू प्रसाद म्हणून देतात. जर तुम्हालाही चंद्रघंटा मातेचा आशीर्वाद हवा असेल तर तिच्या प्रसादाचा भाग म्हणून केसर पेडा अर्पण करा. चला जाणून घेऊया काय आहे केसर पेडा बनवण्याची रेसिपी.

ट्रेंडिंग न्यूज

World Telecommunication Day 2024: जागतिक दूरसंचार दिवस साजरा करण्याचा उद्देश काय? काय आहे यावर्षीची थीम?

joke of the day : मूडमध्ये असलेल्या नवऱ्यानं बनवलेल्या जेवणाला बायकोनं कशी दाद दिली पाहाच!

National Endangered Species Day 2024: राष्ट्रीय लुप्तप्राय प्रजाती दिन साजरा करण्याचा इतिहास काय आहे? जाणून घ्या या दिवस

World Hypertension Day 2024: का साजरा केला जातो वर्ल्ड हायपरटेन्शन डे? जाणून घ्या इतिहास आणि यावर्षीची थीम

केसर पेडा बनवण्यासाठी साहित्य

- खवा - २ कप

- साखर - १/२ कप

- केशर - १/४ टीस्पून

- दूध - १ टेबलस्पून

- वेलची पावडर - १/४ टीस्पून

केसर पेडा बनवण्याची पद्धत

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माँ चंद्रघंटाला केसर पेडा अर्पण करण्यासाठी प्रथम एका भांड्यात खवा घेऊन चांगला बारीक करून घ्या. आता एका लहान वाटीत केशरच्या काड्या आणि १ टेबलस्पून दूध घालून केशर चांगले विरघळून घ्या. यानंतर ही केशरची वाटी बाजूला ठेवा. आता एक पॅन मध्यम आचेवर गरम करा. त्यात मावा टाका आणि ७-८ मिनिटे ढवळत असताना मावा शिजवा. मावा चांगला भाजून झाल्यावर गॅस बंद करा. आता एका प्लेटमध्ये मावा काढा, एकसारखा पसरवा आणि थंड होऊ द्या. १५-२० मिनिटांनी मावा थोडा कोमट असेल तेव्हा त्यात वेलची पूड, केशर दूध आणि चवीनुसार साखर घालून सर्व माव्यात चांगले मिक्स करा. आता हा मावा चांगला झाकून अर्धा तास फ्रिजमध्ये ठेवा. ठरलेल्या वेळेनंतर मावा फ्रिजमधून काढून पुन्हा एकदा पिठासारखा चांगला मळून घ्या. 

आता माव्याचे हे मिश्रण समान भागांमध्ये विभागून पेड्याचा आकार द्या. यानंतर प्रत्येक पेड्यावर एक किंवा दोन केशरचे धागे टाका आणि हलके दाबा. जेव्हा सर्व पेढे तयार होतात, तेव्हा ते पुन्हा एकदा चांगले झाकून ठेवा आणि ४-५ तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवा. असे केल्याने पेडे व्यवस्थित सेट होतील. तुमचे केशर पेडे तयार आहे. माँ चंद्रघंटाला प्रसाद म्हणून अर्पण करा.

पुढील बातम्या