Shahi Paneer Without Onion and Garlic Recipe: चैत्र नवरात्र सुरू होताच कांदा आणि लसूण खाणे बंद केले जाते. अनेक लोक या काळात ९ दिवस उपवास करत नसले तरी काही गोष्टी पाळतात. त्यातील एक म्हणजे कांदा लसूण खाणे बंद करणे. तुम्ही सुद्धा नवरात्र मध्ये कांदा लसूण खात नसाल तर आज शाही पनीरची ही रेसिपी ट्राय करा. प्रत्येक जण शाही पनीर वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो. पण ही रेसिपी बनवायला खूप सोपी आणि खायला टेस्टी आहे. तुम्ही हे पोळी किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करू शकता. चला तर मग जाणून घ्या कांदा लसूण न घालता शाही पनीर कसे बनवायचे.
- पनीर
- टोमॅटो
- आले हिरव्या मिरचीची पेस्ट
- जिरे
- तमालपत्र
- काळी वेलची
- हिरवी वेलची
- लाल तिखट
- हळद
- गरम मसाला
- कसुरी मेथी
- चिमूटभर हिंग
- काजू
- खरबूजच्या बिया
- मलई
- मीठ
- तेल किंवा तूप.
कांदा आणि लसूणशिवाय शाही पनीर बनवण्यासाठी सर्वप्रथम काजू आणि खरबूजाच्या बिया गरम पाण्यात भिजवा. नंतर थोडे पाणी वापरून त्याची मऊ पेस्ट बनवा. आता पनीरचे मोठे चौकोनी तुकडे करून बाजूला ठेवा. आता टोमॅटो धुवून त्याची प्युरी बनवा. कढईत तेल किंवा तूप गरम करा. आता त्यात तमालपत्र, वेलची, जिरे आणि हिंग घाला. जिरे तडतडायला लागल्यावर काश्मिरी लाल मिरची आणि टोमॅटो प्युरी एकत्र घाला. नंतर पेस्ट चांगली भाजून घ्या. थोड्या वेळाने त्यात हिरवी मिरची, आले पेस्ट आणि काजूची पेस्ट घाला. अधून मधून ढवळत असताना भाजा. हे नीट भाजल्यानंतर त्यात हळद, मीठ, तिखट आणि कसुरी मेथी घाला. काही वेळाने क्रीम घालून तेल ग्रेव्हीपासून वेगळे होईपर्यंत शिजवा.
नंतर त्यात पनीरचे तुकडे आणि गरम मसाला घाला. नीट ढवळून घ्यावे आणि नंतर अर्धा कप पाणी घाला आणि उकळी येईपर्यंत शिजू द्या. तुमचे शाही पनीर तयार आहे. रोटी किंवा पराठ्यासोबत गरमा गरम सर्व्ह करा.