मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Valentines Day: शाहरुखचं चाहत्यांना व्हॅलेंटाईन गिफ्ट; DDLJ पुन्हा रिलीज होणार! पण....

Valentines Day: शाहरुखचं चाहत्यांना व्हॅलेंटाईन गिफ्ट; DDLJ पुन्हा रिलीज होणार! पण....

Feb 10, 2023, 09:18 AM IST

    • Valentines Day: 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'मध्ये शाहरुख खान आणि काजोल मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य चोप्रा यांनी केले होते.
DDLJ Movie

Valentines Day: 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'मध्ये शाहरुख खान आणि काजोल मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य चोप्रा यांनी केले होते.

    • Valentines Day: 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'मध्ये शाहरुख खान आणि काजोल मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य चोप्रा यांनी केले होते.

DDLJ Movie: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री काजोल यांचा रोमँटिक ब्लॉकबस्टर चित्रपट ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित होत आहे. १९९५मध्ये प्रदर्शित झालेला DDLJ हा चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. १० फेब्रुवारी रोजी हा चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. शाहरुखच्या चाहत्यांसाठी ही पर्वणीच असणार आहे. मात्र, केवळ एका आठवड्यासाठीच हा चित्रपट मल्टीप्लेक्समध्ये दाखवण्यात येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सावनीने आखला नवा डाव! मुक्ता करेल का सागर आणि आदित्यला माफ? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय होणार जाणून घ्या

उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृहे राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'मध्ये शाहरुख खान आणि काजोल मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य चोप्रा यांनी केले होते. आदित्य चोप्रांचा हा दिग्दर्शकीय पदार्पणातील चित्रपट होता. या चित्रपटामुळे शाहरुख देशातच नाही, तर परदेशातही प्रसिद्ध झाला. या चित्रपटात शाहरुख आणि काजोलची जोडीही चांगलीच पसंत केली गेली होती.

‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ रिलीज झाल्यापासून मुंबईतील मराठा मंदिर या चित्रपटगृहात हा चित्रपट गेल्या २७ वर्षांपासून अखंडपणे चालू आहे. हा एक मोठा रेकॉर्ड आहे. शाहरुखचा हा रोमँटिक चित्रपट पाहणे प्रेक्षकांना आजही तितकेच आवडते. रिलीजनंतर, 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'ला प्रेक्षकांसोबतच समीक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाला १० फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते.

‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट मुंबई, पुणे, अहमदाबाद, सूरत, वडोदरा, गुडगाव, फरिदाबाद, लखनऊ, नोएडा, डेहराडून, दिल्ली, चंदीगड, कोलकाता, गुवाहाटी, बंगळुरू, हैदराबाद, इंदूर, चेन्नई, वेल्लोर आणि त्रिवेंद्रमसह भारतातील ३७हून अधिक शहरांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणे शाहरुख खान आणि काजोलच्या चाहत्यांसाठी एखाद्या ट्रीटपेक्षा कमी नाही.

पुढील बातम्या