मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  The Vaccine War: ‘द वॅक्सीन वॉर’च्या चित्रीकरणाला सुरुवात; पल्लवी जोशीने म्हटली सरस्वती वंदना! पाहा Video

The Vaccine War: ‘द वॅक्सीन वॉर’च्या चित्रीकरणाला सुरुवात; पल्लवी जोशीने म्हटली सरस्वती वंदना! पाहा Video

Dec 15, 2022, 01:34 PM IST

    • The Vaccine War: दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर चित्रपटाच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
The Vaccine War

The Vaccine War: दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर चित्रपटाच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

    • The Vaccine War: दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर चित्रपटाच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

The Vaccine War: ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटानंतर विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या आगामी ‘द वॅक्सीन वॉर’ या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटातून ते कोरोना महामारी आणि या दरम्यान झालेलं लॉकडाऊन यावर भाष्य करण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आता सुरुवात झाली आहे. याचा एक व्हिडीओ विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ‘द वॅक्सीन वॉर’च्या चित्रीकरणाचा शुभारंभ होताना दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’? कामसूत्राशी आहे कनेक्शन

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर चित्रपटाच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये विवेक रंजन अग्निहोत्री यांची पत्नी-अभिनेत्री पल्लवी जोशी सरस्वती वंदना म्हणताना दिसत आहे. पल्लवी जोशीने विधिवत पूजा करत या चित्रपटाच्या शूटिंगचा श्रीगणेशा केला आहे. या व्हिडीओमध्ये पल्लवी जोशी मंत्र म्हणताना दिसत आहे. सोबतच ती चित्रपटाच्या क्लॅपर बोर्डवर चंदनाचा टिळा लावताना दिसत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत असताना कॅप्शनमध्ये विवेक अग्निहोत्री यांनी लिहिले की, ‘सरस्वती वंदनेने द वॅक्सीन वॉर या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. आम्हाला तुमचा आशीर्वाद द्या.’ पुढचे ४० दिवस सलग या चित्रपटाचे चित्रीकरण चालणार आहे. तर, १५ ऑगस्ट २०२३ला तब्बल ११ भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

‘द वॅक्सीन वॉर’ या चित्रपटात कोरोना महामारी दरम्यान देशातील परिस्थिती कशी होती, याचं वास्तववादी चित्रण पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्या टीमने तब्बल एक संपूर्ण वर्ष कोव्हिड परिस्थितीचं निरक्षण करून त्यावर संशोधन केलं आहे. दिग्दर्शक-निर्माते विवेक अग्निहोत्री यांचा ‘द वॅक्सीन वॉर’ हा चित्रपट नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्यावर काम सुरु झाले आहे. या चित्रपटाबद्दलची सगळी माहिती अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

पुढील बातम्या