मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Munmun Dutta: 'एक गूड न्यूज आहे', साखरपुड्याच्या अफवांदरम्यान तारक मेहताच्या निर्मात्यांनी शेअर केला बबिताचा फोटो

Munmun Dutta: 'एक गूड न्यूज आहे', साखरपुड्याच्या अफवांदरम्यान तारक मेहताच्या निर्मात्यांनी शेअर केला बबिताचा फोटो

Aarti Vilas Borade HT Marathi

Mar 14, 2024, 07:54 PM IST

    • Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील बबिताचा म्हणजेच मुनमुन दत्ताचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोवर 'एक गूड न्यूज आहे' असे लिहिण्यात आले आहे.
'एक गूड न्यूज आहे', साखरपुड्याच्या अफवांदरम्यान तारक मेहताच्या निर्मात्यांनी शेअर केला बबिताचा फोटो

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील बबिताचा म्हणजेच मुनमुन दत्ताचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोवर 'एक गूड न्यूज आहे' असे लिहिण्यात आले आहे.

    • Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील बबिताचा म्हणजेच मुनमुन दत्ताचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोवर 'एक गूड न्यूज आहे' असे लिहिण्यात आले आहे.

Munmun Dutta Viral Photo: सध्या सगळीकडे 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत बबीता ही भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता आणि राज अनादकट हे दोन कलाकार चर्चेत आहेत. राजने मुनमुनशी साखरपुडा केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावर मुनमुनने प्रतिक्रिया देत या सर्व अफवा असल्याचे म्हटले. त्यापाठोपाठ आता 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर बबिताचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवरुन अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

अर्जुन सायली कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वाढवून घेणार? मधुभाऊंची केस ठरेल का कारण? ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर!

दिवंगत आईच्या आठवणीत अभिनेत्री तेजश्री प्रधान झाली भावूक! सोशल मीडियावर पोस्ट लिहित म्हणाली...

मुक्ता आणि सईला सोडून सागर जाणार आदित्यसोबत फिरायला, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत रंजक वळण

बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावच्या 'श्रीकांत'ची जेमतेम कमाई, सहाव्या दिवशी फक्त इतकी कमाई

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर मालिकेतील बबिताचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोच्या बँकग्राऊंडमध्ये पोपट लाल आणि अंजली भाजी घेताना दिसत आहेत. त्यांच्या पुढे बबिता कोणाशी तरी फोनवर हसत बोलत असते. ती फोनवर बोलताना कोणाला तरी सांगत असते की, 'हॅलो एक गूड न्यूज आहे.' बबिताचा हा फोटो शेअर करत 'बबिता जी नेमके काय बोलत आहे? लवकर कमेंट करा' असे कॅप्शन देण्यात आले आहे.
वाचा: 'तारक मेहता'मधील बबिता आणि टप्पूचा झाला साखरपुडा?

सध्या सोशल मीडियावर बबिताचा हा फोटो तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोवर कमेंट करत नेटकऱ्यांनी मुनमुन आणि राजची खिल्ली उडवली आहे. तर काही यूजर्सने मालिकेत दया बेन तर परत येणार नाही ना असे म्हटले आहे. हा फोटो निर्मात्यांनी नेमका का शेअर केला आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
वाचा: 'तो काय काम करतो हे मलाही...', सेलिब्रिटींसोबत दिसणाऱ्या ऑरीबाबत रणवीरचे वक्तव्य

साखरपुड्याच्या चर्चांवर मुनमुनची प्रतिक्रिया

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत बबिताची भूमिका साकारणाऱ्या मुनमुन दत्ताने ९ वर्षांनी लहान असलेल्या टप्पू म्हणजेच राज अनादकशी साखरपुडा केल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.मुनमुनने टाइम्स ऑफव इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने सांगितले की, 'या सगळ्या अफवा आहेत आणि चुकीच्या आहेत. मी माझी उर्जा अश्या वायफळ गोष्टींवर वाया घालवत नाही.' मुनमुनच्या या वक्तव्याने साखरपुड्याच्या अफवांना पूर्णविराम देण्यात आला.

पुढील बातम्या