Malaika Arora Funny Video: वयाची ४० ओलांडल्यानंतरही हॉटनेससाठी विशेष ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. ती सतत सोशल मीडियावर तिचे बोल्ड आणि सुंदर फोटो शेअर करत असते. अनेकदा मलायका ही रिविलिंग ड्रेस परिधान करताना दिसता. तिला बऱ्याचदा या लूकसाठी सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. पण सध्या मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री किरण खेर तिला सुनावताना दिसत आहे. या मजेशीर व्हिडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
मलायका अरोरा आणि किरण खेर या दिग्दर्शक करण जोहरच्या चॅट शोमध्ये गेल्या होत्या. मलायकाने यावेळी काळ्या रंगाच शिमरी गाऊन परिधान केला होता. या गाऊनमध्ये मलायका अतिशय हॉट दिसत होती. तर किरण खेर यांनी आकाशी रंगाची सुंदर साडी नेसली आहे. या चॅट शोचे चित्रीकरण सुरु असताना मलायकाला थंडी लागत होती. ती करण जोहरकडे तक्रार करत होती. त्यावर किरण खेर यांनी प्रतिक्रिया देत मलायकाची खिल्ली उडवली आहे.
वाचा: वयाच्या ५०व्या वर्षी सिद्धू मुसेवालाची आई देणार मुलांना जन्म, वडिलांनी केली पोस्ट
किरण खेर यांनी मलायकाला म्हटले, 'मलायका पाय थोडे झाकून बस जेणेकरुन थंडी कमी लागेल. दर दोन मिनिटांनी मांड्या दाखवते आणि मग बोलते की मला थंडी लागते.' किरण खेर जे काही बोलल्या ते ऐकून सर्वांना हसू अनावर झाले. करण जोहर तर स्वत:ला थांबवू शकला नाही.
वाचा: ‘आई कुठे काय करते’मधील अनघा उतरणार राजकारणाच्या रिंगणात?
किरण खेर इथेच थांबल्या नाहीत. त्या पुढे म्हणाल्या, 'आणि हा ड्रेस पहिले वर घे. जो शेपटी सारखा मागे लटकत आहे.' मलायकाला देखील यावर हसू अनावर झाले. ती म्हणाली, 'मांड्या आहेत तर दाखवणारच ना.' ते ऐकून किरण खेर यांनी आवाज वाढवला आणि म्हटल्या, 'हिला प्रत्येक वेळी थंडी लागते असे म्हणत असते. घातले तर काहीच नाही. थोड्या वेळ्यात ही निळी पडेल. थंडी वाजते म्हणजे थंडी.'
सध्या सोशल मीडियावर किरण आणि मलायकाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंटचा वर्षावर केला आहे. एका यूजरने 'किरण खेर काही चुकीचे बोलत नाहीत' असे म्हणत मलायकाला सुनावले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'मलायका कधी तरी पूर्ण कपडे घालत जा' असा सल्ला दिला आहे.