मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Munmun Dutta: 'तारक मेहता'मधील बबिता आणि टप्पूचा झाला साखरपुडा?

Munmun Dutta: 'तारक मेहता'मधील बबिता आणि टप्पूचा झाला साखरपुडा?

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 13, 2024 07:04 PM IST

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत टप्पू ही भूमिका राज अनादकतने साकारली आहे तर बबिताच्या भूमिकेत मुनमुन दत्ता दिसत आहे. दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Munmun Dutta and Raj Anadkat get engaged
Munmun Dutta and Raj Anadkat get engaged

Munmun Dutta And Raj Anadkat: छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका पाहिली जाते. ही मालिका गेली १३ ते १४ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने देखील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आता या मालिकेतील बाबिता ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) आणि टप्पू ही भूमिका साकारलेला अभिनेता राज अनादकट (Raj Anadkat) यांचा साखरपुडा झाल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज अनादकट हा मुनमुनला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. याविषयी मुनमुनला कळाले तेव्हा तिने अफवा पसरवणाऱ्यांना चांगलेच सुनावले होते. अशताच न्यूज १८ या वेब साइटला सूत्रांनी मुनमुन आणि राजच्या खासगी आयुष्याविषयी माहिती दिली आहे. “काही दिवसांपूर्वीच राज आणि मुनमुन यांचा साखरपुडा झाला आहे. दोघांचा साखरपुडा हा वडोदरा (गुजरात) येथे झाला. मुनमुन आणि राजच्या कुटुंबीयांनी त्यांचे नाते मान्य केले आहे आणि तेही या सोहळ्याला उपस्थित होते" अशी माहिती सूत्रांनी दिली.
वाचा: पुरुन उरेल तुम्हाला ही कला; कला-अद्वैतच्या भन्नाट उखाण्याचा व्हिडीओ पाहिलात का?

पुढे सूत्रांनी माहिती दिली की, “तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत राजची एण्ट्री झाल्यानंतर मुनमुन आणि राज यांनी डेट करण्यास सुरुवात केली होती. सेटवर सगळ्यांनाच याची माहिती होती. खरे तर, काही लोकांना खात्री होती की मुनमुन आणि राज लग्न करतील.”
वाचा: स्पृहा जोशीचे छोट्या पडद्यावर पुनरागमन, दिसणार ‘या’ मालिकेत

३६ वर्षांची मुनमुन आणि २७ वर्षांचा राज हे दोघे लवकरच लग्नबंधनात अडणार आहेत, असे म्हटले जात आहे. या दोघांचा नुकताच गुजरातमध्ये साखरपुडाही झाल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे चाहते राज आणि मुनमुन कधी ही आनंदाची बातमी सांगणार यासाठी उत्सुक आहेत.

राजने सोडली मालिका

मुनमुन दत्ता ही २००८ पासून तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत काम करत आहे. तिने अय्यरची पत्नी बबिताची भूमिका साकारली आहे. २०१७मध्ये राजने या मालिकेत एण्ट्री केली. त्यानंतर २०२१मध्ये त्याने ही मालिका सोडली देखील. काही वैयक्तित कारणांमुळे मालिकेला रामराम ठोकल्याचे राजने सांगितले होते. आता ते दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

IPL_Entry_Point