Orry income Source: सध्या एअरपोर्टवर असो वा बॉलिवूडमधील मोठा कार्यक्रम असो ऑरी हा दिसतोच दिसतो. काही दिवसांपूर्वी त्याने देशातील श्रीमंती उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत आणि राधिका मर्चंटच्या प्रीवेडींग कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमातील जवळपास प्रत्येक सेलिब्रिटीसोबतचे त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हा ऑरी आहे तरी कोण ज्याचे प्रत्येक सेलिब्रिटीसोबत फोटो असतात, त्याला प्रत्येक बॉलिवूड इवेंटचे आमंत्रण असते असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तसेच हा ऑरी नेमकं काय करतो? असा प्रश्न देखील सर्वांना पडला आहे. आता अभिनेता रणवीर कपूरने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
ऑरीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्रीवेडींग सोहळ्यातील आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर सिंग बोलताना दिसत आहे. "सर्वांना नमस्कार, हा ऑरी आहे. तो काय काम करतो? हे आजपर्यंत मला माहीत नाही" असे रणवीर म्हणाला आहे. त्यानंतर कॅमेरा हा अर्जुन कपूरकडे करण्यात आला. तो 'ऑरी हा लिव्हर आहे' असे बोलताना दिसत आहे. त्यांचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
वाचा: पुरुन उरेल तुम्हाला ही कला; कला-अद्वैतच्या भन्नाट उखाण्याचा व्हिडीओ पाहिलात का?
ऑरी हा बिग बॉस १७च्या घरात एक दिवसासाठी आला होता. त्याच्या एण्ट्रीने बिग बॉसच्या घरातील वातावरण बदलले होते. अनेकांना तो वाइल्ड कार्ड एण्ट्री असल्याचे वाटत होते. पण केवळ एक दिवसासाठी बिग बॉसच्या घरात गेला आहे. ऑरीच्या एण्ट्री वेळी सलमान खान म्हणाला होता की, 'पार्ट्यांमध्ये आमंत्रित करण्यासाठी पैसे मिळत नाहीत, परंतु काही सेलिब्रिटी त्याला त्याच्या कुटुंबासह आणि मुलांसोबत फोटो पोस्ट करण्यास सांगतात. ज्याचे त्याला जवळपास २० ते ३० लाख रुपये मिळतात.'
वाचा: स्पृहा जोशीचे छोट्या पडद्यावर पुनरागमन, दिसणार ‘या’ मालिकेत
ऑरीने काही दिवसांपूर्वी कॉफी विथ करण या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने करण जोहरशी मनसोक्त गप्पा मारल्या. त्याने त्याच्या लव्हलाइफबद्दलही अनेक खुलासे केले. शोमध्ये करण जोहरने ऑरीला प्रश्न विचारला होत की, 'ऑरी तू सिंगल आहेस का?' त्यावर ऑरीने उत्तर देत म्हटले की, 'मी पाच जणांना डेट करतो आहे.' ऑरीचे उत्तर ऐकून करण जोहरला धक्का बसला. त्याने पुन्हा ऑरीला विचारले की, 'तू खरच पाच जणांना डेट करतो आहेस?' त्यावर पुन्हा तो म्हणतो की, 'होय मी चिटर आहे.' ओरीच्या या उत्तराने अनेकांचे लक्ष वेधले होते.